Indian AStudent Arrested Dainik Gomantak
ग्लोबल

UK: भारतीय विद्यार्थ्याने मद्यधुंद महिलेवर केला बलात्कार, घटना CCTV फुटेजमध्ये कैद; VIDEO व्हायरल

Indian AStudent Arrested: ब्रिटनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका भारतीय विद्यार्थ्याने मद्यधुंद महिलेला आपल्या फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

Manish Jadhav

Indian AStudent Arrested: ब्रिटनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका भारतीय विद्यार्थ्याने मद्यधुंद महिलेला आपल्या फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, प्रीत विकल असे या भारतीय विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वय 20 वर्षे आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, ही धक्कादायक घटना कार्डिफमधील आहे. विकल एका मद्यधुंद महिलेला आपल्या कुशीत घेऊन कुठेतरी घेऊन जात असल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या अहवालात भारतीय विद्यार्थ्याने आपला गुन्हा कबूल केल्याचे म्हटले आहे. 20 वर्षीय विकासने महिलेवर बलात्कार केल्याचे सांगितले. या प्रकरणात त्याला सहा वर्षे, नऊ महिन्यांची शिक्षा झाली आहे.

नाईट आऊट नंतर...

पीडित महिलेने सांगितले की, ती प्रीत विकलला भेटली, जेव्हा ती तिच्या मित्रांसोबत रात्री बाहेर गेली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये घडलेल्या या घटनेनंतर तिला झोप येत नसल्याचे तिने सांगितले. तिने पुढे सांगितले की, नाईट आऊट नंतर तिच्या घरी जाऊ लागली, तेव्हा विकासने तिला पकडले. यानंतर त्याने तिला नॉर्थ रोड परिसरात असलेल्या फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे विकलची ओळख पटू शकली

साऊथ वेल्स पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमुळेच प्रीत विकलाची ओळख पटली आणि त्याला अटक करण्यात आली. ते पुढे म्हणाले की, कार्डिफमध्ये असे हल्ले अत्यंत असामान्य आहेत, परंतु प्रीत विकलने एका मद्यधुंद आणि असुरक्षित महिलेचा फायदा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT