UK New Immigration Policy: भारतीय विद्यार्थ्यांना मोठा झटका! सुनक सरकारने घेतला मोठा निर्णय

Sunak Government: युनायटेड किंग्डममध्ये स्टडीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यूके सरकारने तयार केलेल्या नव्या इमिग्रेशन धोरणामुळे मोठा झटका बसला आहे.
PM Rishi Sunak
PM Rishi SunakDainik Gomantak
Published on
Updated on

Sunak Government New Immigration Policy: युनायटेड किंग्डममध्ये स्टडीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यूके सरकारने तयार केलेल्या नव्या इमिग्रेशन धोरणामुळे मोठा झटका बसला आहे. यामुळे आता विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना यूकेला घेऊन जाऊ शकणार नाहीत.

आकडेवारी जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी ही घोषणा करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, कायदेशीर माइग्रेशन 7 लाखांवर पोहोचले आहे.

यूकेने गेल्या वर्षीच परदेशी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1,35,788 व्हिसा दिले आहेत, जे 2019 च्या तुलनेत 9 पट आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांबाबत (Students) सुनक सरकारने नियमांमध्ये केलेल्या बदलामुळे अनेक भारतीयांचे यूकेला जाण्याचे स्वप्न भंगणार आहे. खरे तर, अनेक भारतीय विद्यार्थी यूकेमध्ये स्टडीसाठी जातात.

त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनाही यूकेचा व्हिसा सहज मिळतो. मात्र नवीन नियमांमुळे त्यांना तसे करता येणार नाही. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सांगितले की, या निर्णयामुळे ब्रिटनमधील मायग्रेशन कमी होईल.

PM Rishi Sunak
Rishi Sunak Statement on Women: किती टक्के महिलांना पुरूषांसारखे लिंग नसते? पंतप्रधान सुनक यांनी काय दिले उत्तर

स्थलांतर कमी करण्यासाठी सरकारवर दबाव

ऋषी सुनक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बदल जानेवारी 2024 पासून लागू केला जाईल, ज्यामुळे स्थलांतराच्या संख्येत मोठा बदल होईल.

तथापि, अधिकृत स्थलांतरणावर याचा काय परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट नाही. कारण सध्या एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी येणारे विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांची गणना झालेली नाही.

गेल्या आठवड्यातही सुनक म्हणाले होते की, त्यांचे मंत्री स्थलांतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

PM Rishi Sunak
Rishi Sunak: पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांचे पहिले भाषण, 'ब्रिटनच्या लोकांसाठी...'

काय आहे नियम जाणून घ्या

या घोषणेमध्ये असे म्हटले आहे की, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या पालकांना यूकेमध्ये राहण्यासाठी व्हिसा दिला जाणार नाही. गेल्या वर्षी, यूकेने विद्यार्थ्यांवर अवलंबून असलेल्यांना 1,35,788 व्हिसा जारी केले.

ही संख्या 2021 च्या तुलनेत 54,486 अधिक आहे. 2020 च्या तुलनेत हे प्रमाण सात पट आहे. ब्रेक्झिटनंतर युरोपियन इकॉनॉमिक एरिया (EEA) ची स्थापना झाल्यापासून UK मधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com