Zakir Naik In FIFA Dainik Gomantak
ग्लोबल

Zakir Naik In FIFA: भारताचा वादग्रस्त इस्लाम धर्मगुरू 'फिफा'मध्ये, 'या' कामासाठी विशेष आमंत्रण

भारतीय गृह मंत्रालयाने झाकीर नाईकवरती बंदी घातली असून, तो सध्या मलेशियात आरामदायी आयुष्य जगत आहे.

Pramod Yadav

Zakir Naik In FIFA: वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकला फिफा विश्वचषक 2022 चे निमंत्रण देण्यात आले असून, झाकीर नाईक कतारमध्ये पोहोचला आहे. भारतात मनी लाँड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषण केल्याचा नाईकवर आरोप आहे. भारतीय गृह मंत्रालयाने झाकीर नाईकवरती बंदी घातली असून, तो सध्या मलेशियात आरामदायी आयुष्य जगत आहे.

भारताने झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) या धार्मिक संघटनेवर 2016 मध्ये बंदी घातली. नाईकवर विविध धार्मिक समुदाय आणि गटांमध्ये शत्रुत्व, द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. सध्या झाकीर नाईक कतारमध्ये पोहोचला आहे. नाईक FIFA विश्वचषक 2022 मध्ये इस्लामचा प्रचार करण्यासह धार्मिक व्याख्याने देखील देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय गृह मंत्रालयाने (MHA) मार्च 2022 मध्ये, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला पाच वर्षांसाठी बेकायदेशीर घोषित केले. नाईक दहशतवाद्यांचे समर्थन करण्यासह प्रत्येक मुस्लिम दहशतवादी असला पाहिजे असा प्रचार करायचा. तसेच, आक्षेपार्ह भाषण करून लोकांची दिशाभूल करायचा. असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT