Indian Foreign Students: सध्या भारतात कामाच्या तासांवर चर्चा सुरु आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्याने यावर वाद सुरु झाला. अनेकांनी बाजूने आणि विरोधात मते द्यायला सुरुवात केली.
आता याबाबतची बातमी कॅनडातून आली आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी कॅनडाने आठवड्यातून 20 तास काम करण्याचा नियम कायमचा काढून टाकावा, अशी मागणी केली आहे. वृत्तानुसार, भारतातूनही अनेक विद्यार्थी आहेत.
कॅनडा सरकारने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 पासून ही मर्यादा तात्पुरती हटवण्याची घोषणा केली होती. याचे कारण असे की, कोरोना महामारीनंतर कंपन्यांना आर्थिक सुधारासाठी आवश्यक कामगार मिळण्यात अडचणी येत होत्या.
सीबीसी न्यूजच्या अहवालानुसार, विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, वाढत्या महागाईमध्ये (Inflation) जास्त कामाचे तास त्यांना स्थिरता देतात. एका विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की, त्याच्यावर 40 हजार डॉलर्सचे शैक्षणिक कर्ज आहे आणि तो पूर्णवेळ काम करुन 10 हजार डॉलर्स देऊ शकतो.
कृणाल चावडा नावाच्या या 20 वर्षीय विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी तो आठवड्यातून 40 तास काम करु शकला, त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती चांगली होती आणि ट्यूशन फी भरण्यात कोणतीही अडचण आली नाही. मात्र, मागील नियमांमुळे चिंतेत असून महागाईमुळे खर्च वाढला आहे.
आणखी एका विद्यार्थ्याचे (Students) म्हणणे आहे की, बहुतांश विद्यार्थी कमी पगारावर काम करतात. किमान पगार सध्या $16 आहे. अशा परिस्थितीत 20 तास काम करुन जगणे फार कठीण आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कॅनडामध्ये राहण्याचा खर्च खूप जास्त आहे आणि तिथे घराचेही मोठे संकट आहे. सुमारे 70 लाख लोक उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांकडून ही मागणी पुढे आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक विद्यार्थ्यांना खूप संघर्षाचा सामना करावा लागत आहे. भारतातून मोठ्या संख्येने विद्यार्थी कॅनडामध्ये शिकण्यासाठी जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.