Russia-Ukraine war  Dainik Gomantak
ग्लोबल

....म्हणून युक्रेनमध्ये भारतीय दूतावासाचे करण्यात आले स्थलांतर

भारतीय दूतावास तात्पुरते पोलंडमध्ये (Polland) हलवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरूच आहे. यामुळे दिवसेंदिवस परिस्थिति अधिक बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय एंबेसी (Embassy) किवमधून हलवण्यात आले आहे. भारतीय दूतावास तात्पुरते पोलंडमध्ये (Polland) हलवण्यात आले आहे.

* पश्चिम बाजूने हल्ला

लक्षणीय म्हणजे युक्रेनमधील (Ukraine) युद्धाची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. युक्रेनचा पश्चिम भागही सतत हल्ले करत आहे. पश्चिम युक्रेनमधील लष्करी प्रशिक्षक तळावर रशियाने (Russia) केलेल्या हवाई हल्ल्यात किमान नऊ जण ठार झाले. तर 57 जण जखमी झाले आहेत. रशियाच्या या हल्ल्याने युद्ध पोलंडच्या (Polland) सीमेजवळ पोहोचले आहे. याआधी रशियाच्या एका वरिष्ट अधिकाऱ्याने असा इशारा दिला होता की, मास्को परदेशातून युक्रेनला लष्करी पुरवठ्याला लक्ष्य करेल.

ल्विव प्रांताचे गव्हर्नर मॅकसिम कोजित्स्की यांनी सांगितले की रशियन सैन्याने ल्विव शहराच्या उत्तर- पश्चिमेला 30 किलोमीटर अंतरावर यावोरीव लष्करी तळावर किमान 30 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. हा लष्करी तळ युक्रेनियन प्रदेशात पोलिश सीमेपासून 35 किमी अंतरावर आहे. अधिकार्यांनी सांगितले की, रशियन सैन्याने पश्चिम युक्रेनच्या इव्हानो-फ्रँकिव्हस्क शहरातील विमानतळावरही गोळीबार केला. असे हल्ले करून रशियाला भीती आणि अराजकता निर्माण करायची होती, असे महापौर रुस्लान मार्टसिंकीव्ह यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Konkani Language: 38 वर्षांत राजपत्र कोकणीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही कुठल्या सरकारला करता आला नाही; भाषा अभिमान आणि वास्तव

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT