India Slams Pakistan Terror Safe Havens UNSC Dainik Gomantak
ग्लोबल

''लादेन कुठं लपला होता माहितचं असेल...'', भारतानं पुन्हा फाडला पाकड्यांचा बुरखा; दहशतवाद्यांच्या आश्रयदात्याचा पर्दाफाश

India Slams Pakistan Terror Safe Havens UNSC: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर उघडे पाडत, दहशतवादाला सरकारी धोरण म्हणून पाठिंबा देणाऱ्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला.

Manish Jadhav

India Slams Pakistan Terror Safe Havens UNSC: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर उघडे पाडत, दहशतवादाला सरकारी धोरण म्हणून पाठिंबा देणाऱ्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनेनी यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले की, दहशतवाद्यांना मिळणाऱ्या सुरक्षित आश्रयस्थानांवर आणि सुरक्षित ठिकाणांवर अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

9/11च्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार आणि अल-कायदाचे प्रमुख ओसामा बिन लादेन, खालिद शेख मोहम्मद, रमजी बिन अल-शिभ यांसारखे कुख्यात दहशतवादी कोणत्याही कायद्याच्या कचाट्याबाहेर नव्हते, तर ते एका देशाच्या शहरी भागांत राजरोसपणे आश्रय घेऊन राहत होते, असा थेट हल्लाबोल भारताने पाकिस्तानवर केला.

भारताने (India) स्पष्ट शब्दांत सांगितले की, मे 2011मध्ये अमेरिकेने 'ऑपरेशन नेप्च्यून स्पीयर' अंतर्गत पाकिस्तानच्या अबोटाबादमधील एका सुरक्षित कंपाऊंडमधून ओसामा बिन लादेनचा शोध घेऊन त्याला कंठस्नान घातले. याच धर्तीवर भारताने लश्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या धोकादायक दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या आश्रयाचा मुद्दा उपस्थित केला. हे दहशतवादी नेटवर्क वेगवेगळ्या नावांचा आणि बोगस ओळखींचा वापर करुन संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारतीय प्रतिनिधीने केला. अशा संघटनांच्या नेतृत्वाला आणि दहशतवादी प्रशिक्षणाच्या पायाभूत सुविधांना कठोर कारवाईपासून पळवाट मिळता कामा नये.

आपल्या वक्तव्यात भारताने मे 2025 मध्ये राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चाही थेट उल्लेख केला. या धाडसी अभियानादरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील लश्कर आणि जैशच्या प्रमुख ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. भारताने स्पष्ट केले की, दहशतवादाविरोधात केवळ निर्बंध लादणे पुरेसे नसून, ज्या परिस्थितीत या अतिरेक्यांना संसाधने, निधी आणि सुरक्षित आश्रय मिळतो, ती संपूर्ण व्यवस्थाच मुळापासून नष्ट करणे गरजेचे आहे.

कोणत्याही देशात दहशतवाद्यांना सुरक्षित स्थान मिळणार नाही याची खात्री UNSC ने केली पाहिजे, असे आवाहन भारताने केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात प्रभावी आणि मजबूत सहकार्य हाच निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आणि भविष्यातील शोकांतिका रोखण्याचा एकमेव मार्ग असल्याचे भारताने ठामपणे मांडले. भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय मंचावर पुन्हा एकदा मोठी नाचक्की झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UPI Payment Charges: UPI आता 'मोफत' राहणार नाही? 2 हजारांवरील व्यवहारांवर 0.4 टक्के MDR; झटपट पेमेंटची किंमत ग्राहकांनाही मोजावी लागणार?

Goa Beach Shacks: गोव्याच्या 'शॅक कायद्या'च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान; पर्यावरणाला धोका असल्याचा दावा, हायकोर्टाची सरकारला नोटीस

Goa Dairy: गोवा डेअरीचे व्यवस्थापन 'NDDB'कडेच राहणार? हायकोर्टाचे निर्देश; सर्व निर्णय आणि सामंजस्य कराराचे प्रतिज्ञापत्र सादर करा

Varca Panchayat Construction Permit: हायकोर्टाच्या निर्देशांनाच हरताळ; बांधकाम परवान्यात स्वतःच्या अटी लादल्याने वार्का पंचायत सचिवाला कडक ताकीद

Online Payment: ऐन गणेश चतुर्थीत गॅससाठी 'रोखी'ची सक्ती; Google Pay बंद, ऑनलाइन पेमेंट करता न आल्याने ग्राहकांची मोठी परवड

SCROLL FOR NEXT