India Slams Pakistan
India Slams Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

India slams Pakistan at UNHRC: कंगाल पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उकरून काढताच भारताने सुनावले खडेबोल

दैनिक गोमन्तक

India slams Pakistan at UNHRC: पाकिस्तान सध्या अनेक समस्यांना सामोरे जात आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीर (Kashmir) मुद्द्यावरुन भारताला (India) लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

यूएनएचआरसी (UNHRC) परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उकरुन काढताच भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. UNHRC परिषदेत भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना म्हटलं की, "पाकिस्तानमध्ये अनेक अडचणी आहेत. जनता त्रास सहन करत आहे. तुमचे दोन वेळेच्या खायचे वांदे, आधी स्वत:कडे बघा." 

  • काश्मीरचा मुद्दा काढताच भारताने पाकिस्तानला सुनावले खडेबोल

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानच्या (Pakistan) परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी खारयांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण भारताने पाकिस्तानला चांगले सुनावले आहे. भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानची खरडपट्टी काढत त्याला सद्य परिस्थितीची जाणिव करुन दिली.

  • 'पाकिस्तानने लोकांच्या हितासाठी काम करावं'

पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी यांनी काश्मिरींबाबत भारतावर (India) खोटे आरोप केले. पण भारताने त्यांच्या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय प्रतिनिधी पुजानी यांनी म्हटलं की, "पाकिस्तानचे लोक त्यांचं आयुष्य, उपजीविकेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. पण पाकिस्तान भारतावर खोटे आरोप करणं सोडत नाहीत.

मी पाकिस्तानच्या नेतृत्वाला आणि अधिकाऱ्यांना सल्ला देतो की, त्यांनी निराधार प्रचाराऐवजी लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी आपली ऊर्जा वापरावी. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने भारताचा अपप्रचार करण्यासाठी या व्यासपीठाचा पुन्हा एकदा गैरवापर केला आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT