India should do what China did a year ago to stop Corona Dr Fauchis advice 
ग्लोबल

‘कोरोनाला रोखण्यासाठी चीननं जे वर्षभरापूर्वी केलं ते भारतानं करावं’; डॉक्टर फौचींचा सल्ला

गोमंतक वृत्तसेवा

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे असं मत अमेरिकेतील (America) व्हाईट व्हाईसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अ‍ॅंथनी फौची (Anthony Fauchi) व्यक्त केलं आहे. या घातक महामारीचा सामना करण्यासाठी देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मीतीचं प्रमाण वाढवण्याची गरज असल्याचं मत डॉ. फौची यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तसेच फौची यांनी चीनने (China) एका वर्षापूर्वी जे काही केलं तेच आता करण्याची भारताला (India) गरज असल्याचा उल्लेख तात्पुरत्या रुग्णालयांच्या संदर्भात बोलताना केला,

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे वैद्यकीय सल्लागार असणा फौची यांनी, ‘’कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यात आलं पाहिजे. भारतात हा जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश आहे. त्यांना लसनिर्मिती करण्यासाठी स्वत:च्या देशातून तसेच जगभरातील देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे,’’  असं सांगितलं. (India should do what China did a year ago to stop Corona Dr Fauchis advice)

भारत सर्वात मोठा लस निर्माण करणारा देश असल्याने, इतर देशांनी भारताला लस निर्मिती करण्यासाठी मदत केली पाहिजे किंवा भारताला जास्तीत जास्त कोरोना प्रतिबंधक लसी दान केल्या पाहिजेत,‘’ असं फौची यांनी म्हटलं आहे. भारतातील सध्याची परिस्थिती सामान्य झाल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन वाढवून ती जगभरातील इतर देशांना पाठवता येईल असे संकेत यावेळी फौची यांनी दिले आहेत. डॉ. फौची यांनी मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना भारतामध्ये तात्काळ स्वरुपाची रुग्णालये उभारण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. एका वर्षाभरापूर्वी चीननं ज्याप्रकारे कोरोनासंदर्भात तात्काळ रुग्णालये उभारली होती. तो आदर्श भारतानं घेणं अत्यंत गरजेचं आहे. 

दरम्यान, भारतात देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) लावण्य़ाची गरज असल्याचा पुनरुच्चार देखील यावेळी व्यक्त केला आहे. संसर्गरोग क्षेत्रामध्ये तज्ञ मानल्या जाणाऱ्या फौची यांनी म्हटलं की, भारतामधील कोरोनाची परिस्थिती अत्यंत नाजूक स्वरुपाची आहे. जेव्हा जास्त लोकांना संसर्ग होतो त्यावेळी त्यांची पुरेशी काळजी घेणं देखील तेवढचं महत्त्वाचं असतं, अस फौची यांनी काही दिवसांपूर्वीचं म्हटलं होतं. तसेच देशात लॉकडाऊन केला तरच कोरोनाला आटोक्यात आणू शकतो असंही फौची यांनी म्हटलं होतं. गेल्या वर्षी चीननं देखील लॉकडाऊनचाचं पर्याय निवडला होता. ऑस्ट्रेलिया (Australia), न्यूझीलंड (New Zealand) या देशांनी मर्यादित स्वरपातील लॉकडाऊन केला होता. तुम्हाला अगदीच सहा महिन्यांच्या लॉकडाऊनची गरज नाही काही आठवड्यांसाठी लॉकडाऊन लावावा लागेल आणि त्यानंतरच त्याचा परिणाम दिसून येईल. लॉकडाऊनमुळे विषाणूच्या प्रसाराला आटोक्यात येत असतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक आहे, असं देखील डॉ. फौची यांनी यावेळी सांगितले
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT