Vladimir Putin & Narendra Modi Dainik Gomantak
ग्लोबल

भारताने रशियापुढे ठेवला रुपयात तेल-शस्त्रे खरेदीचा प्रस्ताव, ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता

भारत रशियासोबत व्यापार आणखी वाढवण्याचा विचार करत आहे.

दैनिक गोमन्तक

युक्रेनवरील हल्ल्यावरून अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत, मात्र भारत रशियासोबत व्यापार आणखी वाढवण्याचा विचार करत आहे. भारताने रशियासोबत रुपयात व्यापार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. (India Russia)

या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने ब्लूमबर्गला सांगितले की, भारताने रशियाकडून रुपयात तेल आणि शस्त्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रशियन राज्य-नियंत्रित VTB बँक PJSC आणि Sberbank PJSC मध्ये सुमारे $2 अब्ज ठेवी वापरण्याची भारताची योजना आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने सांगितले की या योजनेला लवकरच अंतिम रूप दिले जाऊ शकते. रशियाचे वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान योजनेला हिरवा कंदील दाखवला जाण्याची शक्यता आहे.

रुपया-रुबल मध्ये द्विपक्षीय व्यापार करण्याचा प्रयत्न केला

तत्पूर्वी, दोन्ही देशांनी रुपया-रुबल अंतर्गत व्यापार सुरू केला, जो रशियन चलन रूबलमध्ये जास्त अस्थिरतेमुळे प्रभावी ठरला नाही. अहवालानुसार, रशियाच्या बँक खात्यांमध्ये जमा होणारी रक्कम वर्षअखेरीस पाच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते. हे गणित भारत किती उत्पादन खरेदी करत आहे यावर अवलंबून असणार आहे.

युक्रेन युद्धामुळे अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि जपानने रशियावर आर्थिक निर्बंध लादले, ज्यामुळे रशियन तेल स्वस्त झाले. या स्वस्त तेलाचा फायदा घेण्यासाठी मोदी सरकारने तेल आयातीवरील बंदी हटवली आहे. या दिशेने पावलं टाकत असलेले मोदी सरकार एका तेल यंत्रणेला कायम करण्याच्या प्रयत्नात आहे.

भारत, रशियासाठी 6.61 अब्ज डॉलरचा घाटा

भारताला रशियाच्या स्वस्त तेलाची मदत मिळू शकते. मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताची रशियासोबतची व्यापार तूट $6.61 अब्ज होती. दोन्ही देशांमधील एकूण व्यापार $13.1 अब्ज आहे.

भारत आपला लेखाजोखा सुधारण्यासाठी फार्मास्युटिकल्स, प्लास्टिक आणि रसायने यांसारख्या उत्पादनांच्या निर्यातीवर भर देत आहे. भारत हा जगातील रशियन शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. याच कारणामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया भारतावर रशियन तेल खरेदी करू नये यासाठी सतत दबाव आणत आहेत.

ऐतिहासिकदृष्ट्या, भारताने जगातील शक्तिशाली देशांमधील कोणत्याही प्रकारच्या तणावाबाबत नेहमीच तटस्थ भूमिका ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेसह भारत नुकताच क्वाड सारख्या संघटनेत सामील झाला आहे. रशियन तेल खरेदी करणारा भारत हा एकमेव आशियाई देश नाही. चीन हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT