Operation Amistad Dainik Gomantak
ग्लोबल

Operation Amistad: "थँक्यू इंडिया!" भारताच्या 'ऑपरेशन अमिस्ताद'ने जिंकले मन, व्हेनेझुएलाच्या नागरिकांचे पाणावले डोळे; मानले जाहीर आभार VIDEO

Operation Amistad Venezuela Earthquake Relief: विनाशकारी भूकंपाच्या भीषण संकटाचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलाला भारताने मदतीचा मोठा हात दिला.

Manish Jadhav

Operation Amistad Venezuela Earthquake Relief: विनाशकारी भूकंपाच्या भीषण संकटाचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलाला भारताने मदतीचा मोठा हात दिला. या कठीण प्रसंगी भारताकडून राबवल्या जाणाऱ्या मदत आणि बचावकार्याबद्दल व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संकटग्रस्त भागात व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारतीय लष्कराने युद्धपातळीवर मदत मोहीम सुरु केली असून, तिथे उभारण्यात आलेल्या लष्कराच्या तात्पुरत्या 'फील्ड हॉस्पिटल'मधील उत्कृष्ट आरोग्य सुविधांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 'एक्स'वर काही भावूक व्हिडिओ शेअर केले. या व्हिडिओमध्ये स्थानिक नागरिक आणि बाधित कुटुंबे भारतीय लष्कराच्या डॉक्टरांचे आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानताना दिसत आहेत. उपचार घेतलेल्या एका स्थानिक महिलेने भारतीय वैद्यकीय तज्ज्ञांच्या संवेदनशील सेवेची आणि उत्तम काळजी घेतल्याबद्दल मनापासून स्तुती केली. तर एका ज्येष्ठ नागरिकाने भावूक होत सांगितले की, "माझ्या आयुष्यातील गेल्या 60 वर्षांत मी इतकी दर्जेदार आणि तत्पर वैद्यकीय सेवा कधीही पाहिली नव्हती. भारतीय लष्कराचे हे रुग्णालय आमच्यासाठी देवदूतासारखे ठरले."

भारताने व्हेनेझुएलामध्ये 24 जून रोजी आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर तातडीने 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) सुरु केले. या अंतर्गत भारतीय सशस्त्र दलाच्या तुकडीने व्हेनेझुएलाची राजधानी काराकस येथील 'ला रिंकोनाडा' भागात सर्व सोयींनी सज्ज असे फील्ड हॉस्पिटल उभारले. या विशेष मोहिमेद्वारे बाधित लोकांना औषधे, जीवनावश्यक वस्तू आणि तातडीची वैद्यकीय मदत दिली जात आहे. व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि भारतातील व्हेनेझुएलाच्या दूतावासानेही या द्विपक्षीय सहकार्याबद्दल भारताचे जाहीर कौतुक केले.

दुसरीकडे, व्हेनेझुएलातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शक्तिशाली भूकंपामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तब्बल 1719 वर पोहोचली आहे. या आपत्तीचा 22619 लोकांना थेट फटका बसला असून 5034 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे 855 इमारतींचे नुकसान झाले असून, त्यापैकी 189 इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. 24 जून रोजी आलेल्या मुख्य भूकंपानंतर आतापर्यंत 609 हून अधिक भूकंपाचे आफ्टरशॉक्स नोंदवले गेले आहेत. दरम्यान, अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेच्या अंदाजानुसार, या नैसर्गिक आपत्तीतील मृतांचा एकूण आकडा 10000 च्या पार जाण्याची भीती 44 टक्के वर्तवली जात आहे. अशा अत्यंत भीषण परिस्थितीत भारतीय लष्कराचे (Indian Army) जवान तिथे अहोरात्र सेवा देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Elevated Road: अटल सेतूवरून पर्वरीत उतरण्याचा मार्ग अखेर खुला! मडगाव, वास्को, फोंडा, बांबोळीहून उत्तर गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा

Goa Congress: 'गोवा काँग्रेस पक्ष' खरंच आधीपासून अस्तित्वात होता का? निवडणूक आयोग सोमवारी प्रतिज्ञापत्रातून उलगडणार पक्षाच्या नावाचे गूढ

Goa Politics: 'ते' चॅटिंग मोठ्या स्क्रीनवर दाखवणार! विरोधकांच्या आरोपांना नगरनियोजनमंत्री राणेंचा इशारा; म्हणाले, "योग्य वेळी जनतेसमोर आणू"

Pakistan Airstrikes Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा मोठा हवाई हल्ला! बॉम्बस्फोटांनी हादरलं कंदहार; ड्यूरंड लाईनवर दाटले युद्धाचे ढग VIDEO

Life Course Immunization: हृदयरोग, मधुमेह, कर्करोगग्रस्तांना मिळणार लसीचे कवच! गोव्यात 'लाईफ-कोर्स इम्युनायझेशन 2026-2036'ची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT