India Forex Reserves Dainik Gomantak
ग्लोबल

India Forex Reserves: भारताची आर्थिक ताकद वाढली, परकीय चलन साठ्याने गाठली नवीन उंची; पाकड्यांची कंगाली पुन्हा आली जगासमोर!

Forex Reserves Data: 15 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 1.48 अब्ज डॉलरने वाढून 695.10 अब्ज डॉलर इतका झाला आहे.

Manish Jadhav

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 1.48 अब्ज डॉलरने वाढून 695.10 अब्ज डॉलर इतका झाला. ही आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर केली. यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीला आणखी बळकटी मिळाल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, सप्टेंबर 2024 च्या अखेरीस भारताचा परकीय चलन साठा 704.885 अब्ज डॉलरवर पोहोचला होता, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे.

दरम्यान, या आठवड्यात परकीय चलन साठ्याच्या प्रमुख घटकांमध्ये बदल दिसून आला. एकूण साठ्यातील सर्वात मोठा हिस्सा असलेल्या परकीय चलन मालमत्ता (Foreign Currency Assets) 1.92 अब्ज डॉलरने वाढून 585.90 अब्ज डॉलरवर पोहोचल्या. या मालमत्तांमध्ये केवळ अमेरिकन डॉलरच नव्हे, तर युरो, पौंड आणि येन यांसारख्या इतर प्रमुख विदेशी चलनांच्या मूल्यांमधील चढ-उतारही समाविष्ट असतात.

याच कालावधीत, देशाच्या सोन्याच्या साठ्यात घट झाली. सोन्याचा साठा 2.16 अब्ज डॉलरने कमी होऊन 86.16 अब्ज डॉलर राहिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) भारताच्या राखीव स्थितीमध्ये (Reserve Position) 1.5 कोटी डॉलरची वाढ झाली असून, ती आता 4.75 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

RBI ची भूमिका महत्त्वाची

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) वेळोवेळी परकीय चलन बाजारात डॉलरची खरेदी-विक्री करुन रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. बाजारातील तरलता (Liquidity) संतुलित ठेवण्यासाठी देखील हे प्रयत्न केले जातात. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, ते परकीय चलन बाजारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि रुपयाच्या विनिमय दरात (Exchange Rate) जास्त चढ-उतार होऊ नये म्हणून केवळ आवश्यक असेल तेव्हाच हस्तक्षेप करतात.

पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यातही सुधारणा

एकीकडे भारताचा साठा वाढत असताना, दुसरीकडे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यातही किरकोळ सुधारणा दिसून आली आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा साठा 1.3 कोटी डॉलरने वाढून 14.256 अब्ज डॉलर इतका झाला आहे.

केंद्रीय बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाचा एकूण परकीय चलन साठा 19.571 अब्ज डॉलर आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांचा हिस्सा 5.315 अब्ज डॉलर आहे, तर स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे 14.256 अब्ज डॉलरचा साठा आहे.

केट्रेड सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, हा एकूण साठा 2.32 महिन्यांच्या आयातीचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या साठ्यात आठवडा-दर-आठवडा 0.09 टक्के, तर व्यावसायिक बँकांच्या साठ्यात 1.16 टक्के वाढ झाली आहे. एकंदरीत, भारताचा परकीय चलन साठा आर्थिक स्थैर्याचे मजबूत संकेत देत आहे, तर पाकिस्तानच्या साठ्यातही किरकोळ पण सकारात्मक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

Ravichandran Ashwin BBL: रविचंद्रन अश्विन 'बिग बॅश लीग'मध्ये खेळणार, 'या' संघाकडून मैदानात उतरणार; 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय

Salman Khan: बॉलिवूडचा सल्लूभाई म्हणतो, 'एक दिवस मलाही मुलं होतील'

SCROLL FOR NEXT