China President Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

China: शी जिनपिंग यांचा नवा प्लॅन आला समोर, PLA ला 'ग्रेट वॉल ऑफ स्टील' बनवण्याची...

China President Xi Jinping: शी जिनपिंग हे सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ते अधिक मजबूत झाले आहेत.

Manish Jadhav

China President Xi Jinping: शी जिनपिंग हे सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ते अधिक मजबूत झाले आहेत. पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पीपल्स लिबरेशन आर्मी पीएलएबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, LAC वर भारतासोबत (India) सुरु असलेला तणाव आणि तैवानसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान ते म्हणाले की, PLA ला 'ग्रेट वॉल ऑफ स्टील' बनवण्याची वेळ आली आहे. जेणेकरुन देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करता येईल.

शी जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख म्हणून अभूतपूर्व तिसर्‍या कार्यकाळाच्या सुरुवातीला ही टिप्पणी केली. चीनच्या (China) सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजेच 'सीपीसी'चे नेतृत्व कायम ठेवण्याचे आवाहनही जिनपिंग यांनी केले.

दुसरीकडे, NPC समारोप समारंभात जिनपिंग यांनी सर्व आघाड्यांवर राष्ट्रीय आणि सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला.

तसेच, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या स्वातंत्र्याबाबत बाह्य हस्तक्षेप आणि फुटीरतावादी कारवायांना ठामपणे विरोध करण्याविषयी बोलले. चीनच्या LAC म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतासोबतचा तणाव कायम असताना जिनपिंग यांनी सशस्त्र दलांना बळकट आणि आधुनिकीकरण करण्याबाबत बोलले आहे.

त्याचबरोबर, भारताबरोबर लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, तरीही संबंध सामान्य नाहीत. त्याचबरोबर तैवानबाबत अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावही गेल्या वर्षी सर्वश्रुत होता. हा संघर्ष केव्हाही मोठे रुप धारण करु शकतो हे पाहून जिनपिंग यांनी आपल्या सैन्यात आणखी सुधारणा करण्याबाबत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT