Aircraft Dainik Gomantak
ग्लोबल

Year Ender 2023: भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे लष्कर, फ्रान्स-ब्रिटनला सोडले मागे

Year Ender 2023: भारतीय लष्कराने या वर्षीही आपले लष्करी सामर्थ्य जगभर सिद्ध केले. ग्लोबल फायरपॉवरची 2023 रँकिंग याची पुष्टी करते.

Manish Jadhav

Year Ender 2023: भारतीय लष्कराने या वर्षीही आपले लष्करी सामर्थ्य जगभर सिद्ध केले. ग्लोबल फायरपॉवरची 2023 रँकिंग याची पुष्टी करते. रँकिंगनुसार, भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. ग्लोबल फायरपॉवर वेबसाइट जगातील देशांच्या संरक्षणाशी संबंधित माहितीचा मागोवा घेते. जगातील 145 देशांच्या सैन्याच्या क्षमतेचे विश्लेषण करुन 2023 ची क्रमवारी जाहीर केली होती. या क्रमवारीत भारताचा क्रमांक युनायटेड किंगडम, फ्रान्स, पाकिस्तान या देशांपेक्षा चांगला होता.

दरम्यान, 2023 मध्ये एकीकडे संरक्षण मंत्रालयाने सुरक्षा शस्त्रांच्या आयातीचा नवा विक्रम केला, तर दुसरीकडे स्वदेशी उत्पादकांनाही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी ऑर्डर मिळाली. लष्कर, हवाई आणि नौदल या तिन्ही भारतीय सशस्त्र दलांमध्ये भारतात उत्पादित शस्त्रांचा समावेश करण्यात आला आणि आत्मनिर्भर भारताच्या उपक्रमाला बळ मिळाले. चला तर मग यावर्षी संरक्षण क्षेत्रात काय चर्चेत होते ते जाणून घेऊया...

16,000 कोटींचा आकडा गाठला

भारत पूर्वी सुरक्षा शस्त्रे आयात करण्यासाठी ओळखला जात होता. पण सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे आज भारत शस्त्रास्त्र निर्यातीत नवे विक्रम निर्माण करत आहे. 2023 मध्ये भारतीय शस्त्रास्त्र निर्यातीचा विक्रम 16,000 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे अंदाजे 3,000 कोटी रुपये अधिक आहे. 2016-17 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये संरक्षण निर्यातीत 10 पटीने जास्त वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये 1,521 कोटी रुपयांची सुरक्षा निर्यात झाली. त्याचवेळी, 2013-14 मध्ये 686 कोटी रुपयांची निर्यात झाली होती. अशाप्रकारे पाहिले तर संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत 23 पट वाढीची अभूतपूर्व कामगिरी 10 वर्षात झाली आहे. हे आकडे जगातील संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भारताच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि तेजस यान यांसारख्या भारतीय बनावटीच्या शस्त्रांना जगभरातून मागणी वाढली आहे. 2024 च्या सरकारी अहवालानुसार, 100 भारतीय कंपन्या 85 हून अधिक देशांमध्ये भारतीय शस्त्रे निर्यात करत आहेत. आत्मनिर्भर उपक्रमांमुळे भारताचे परदेशी उपकरणांवरील अवलंबित्वही कमी झाले आहे.

ऐतिहासिक लष्करी सराव

मार्चमध्ये केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पंगोड मिलिटरी स्टेशनवर भारतीय लष्कर आणि फ्रेंच सैन्यादरम्यान संयुक्त लष्करी सराव झाला. त्याला ‘फ्रींजेक्स-23’ असे नाव देण्यात आले. या प्रकारात दोन्ही देशांच्या सैन्याने प्रथमच भाग घेतला. याशिवाय, भारताने सिंगापूरमध्ये आसियान देशांसोबत पहिला सागरी सरावही केला. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी GSAT-7B नावाच्या प्रगत उपग्रहाला परवानगी दिली. या उपग्रहामुळे लष्कराला गुप्तचर दळणवळणात मदत होणार आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) सोबत सुमारे 3000 कोटी रुपयांचा करार केला. इस्रो हा उपग्रह बनवणार आहे.

शत्रूला भेदणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

नौदलाने मीडियम रेंज सरफेस टू एयर मिसाइलची (MRSAM) यशस्वी चाचणी केली. MRSAM हे जहाजविरोधी मिसाइल भारतात बनलेले आहे. हे मिसाइल भारताच्या DRDO आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. अग्नी-1 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाइलची ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी घेण्यात आली. अग्नी-1 हे मिसाइल सरफेसवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेले मिसाइल आहे. ते अतिशय उच्च पातळीच्या अचूकतेसह लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. हे डीआरडीओने विकसित केले आहे.

भारतीय नौदलाची ताकद वाढली

वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात, भारतीय नौदलाने कलवरी क्लासची पाचवी पाणबुडी INS Vagir कार्यान्वित केली होती. ही भारतात बनवली गेली आहे. त्यात अनेक मोठी मिसाइल ठेवता येतात आणि त्याची रडार यंत्रणा जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. आत्तापर्यंत स्वदेशी बनावटीच्या पाणबुड्यांपैकी हे सर्वात कमी वेळात पूर्ण झाली आहे. तसेच, क्रेस्ट ऑफ यार्ड 12706 (इम्फाळ), प्रोजेक्ट 15B गाइडेड मिसाइलचा तिसरा स्टील्थ ड्रिस्ट्रॉयर द क्रेस्ट ऑफ यार्ड, नोव्हेंबरमध्ये अनावरण करण्यात आला आणि डिसेंबरमध्ये नौदलात सामील होण्याची तयारी सुरु आहे. ईशान्येकडील राज्यातील शहराचे नाव दिलेली ही पहिली युद्धनौका आहे. हे जहाज ब्रह्मोस मिसाइल डागण्यास सक्षम आहे.

शस्त्रे आणि परराष्ट्र धोरण

यावर्षी भारताने अनेक देशांसोबत सुरक्षा करारांना मंजुरी दिली आहे. ब्रह्मोस मिसाइल विकण्याबाबत भारत सुमारे डझनभर देशांशी चर्चा करत आहे. यामुळे केवळ आर्थिक फायदा होणार नाही तर इतर देशांसोबत धोरणात्मक भागीदारीचे आश्वासनही मिळेल. फिलिपाइन्स, इंडोनेशिया आणि व्हिएतनामला ब्राह्मोसच्या विक्रीने भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाला बळकटी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa News: पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय; वाचा गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT