India and America Good Friends said Donald Trump Twitter
ग्लोबल

'भारत-अमेरिका चांगले मित्र', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने का टवकारले अनेकांचे कान?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या संबंधांबद्दल सकारात्मक वक्तव्य केलं. 'भारत आणि अमेरिका चांगले मित्र'

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या संबंधांबद्दल सकारात्मक वक्तव्य केलं. भारत आणि अमेरिका चांगले मित्र आहेत, असे ट्रम्प एका मुलाखतीत बोलताना स्पष्टपणे ऐकू येत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी अमेरिका भारता संबंधांबद्दलच्या या वक्तव्याकडे एक नवी घोषणा म्हणून बघितले जात आहे.

आगामी निवडणूक लढवण्याबाबत मी लवकरच निर्णय घेईन, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. माझ्या या निर्णयामुळे लोक खूप खूश होतील असे मला वाटते. माझे भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यात खूप चांगले संबंध आहेत. मला वाटते पीएम मोदी भारतात खूप चांगले काम करत आहेत, असे म्हणत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाचे कौतूकही केले.

मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा हल्ल्याबाबत सांगितले. 'मी त्यावेळी तिथे उपस्थित नव्हतो. मला नंतर बोलावण्यात आले. ही अतिशय विचित्र घटना होती. मला गेल्या वेळेपेक्षा काही लाख जास्त मते मिळाली आहेत. डेमोक्रॅट्सने स्वतंत्र निवडणुकांची मागणी केली आहे, असेही ट्रम्प मिळाले.

खरं तर, 2019 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्तपणे ह्यूस्टन, टेक्सासमध्ये हाऊडी मोदी रॅलीला संबोधित केले होते. या कार्यक्रमात हजारो भारतीय-अमेरिकन सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पीएम मोदींनी ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’चा नारा दिला होता. अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी ह्युस्टनमध्ये या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दिवसांत ट्रम्प निवडणुकीचा प्रचारही करत होते.

त्याच वेळी, पुढील वर्षी 2020 मध्ये, कोविड -19 च्या आधी, ट्रम्प यांनी भारताला भेट दिली. यादरम्यान गुजरातमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती खास आकर्षण होते. अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी मेगा रोड शो केला होता ज्यात लाखो लोक सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Dindi Mahotsav: विठ्ठल विठ्ठल!मडगावात 116 व्या दिंडी उत्सवास प्रारंभ; मंत्री कामत यांच्या हस्ते समई प्रज्वलन

Goa Homestay Scheme: गोवा सरकारचे मोठे पाऊल! गावागावांत फुलणार पर्यटन; ‘होमस्‍टे आणि बेड व ब्रेकफास्‍ट’ योजना; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Goa politics: खरी कुजबुज; भाजप श्रेष्ठींपुढे फोंड्याचा पेच

Goa Coconut Price: गोवेकरांवर 'नारळ' का रुसलाय? बाजारात तुटवडा कायम; दर अजून भडकलेलेच

Panaji: ‘अटल सेतू’खाली आढळला कुजलेला मृतदेह! अनोळखी फोनवरून मिळाली माहिती; मृत मणिपूरचा रहिवासी

SCROLL FOR NEXT