NATO Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: स्लोव्हाकियाच्या संसदेने NATO च्या तैनातीला दिली मान्यता

स्लोव्हाकियाच्या (Slovakia) संसदेने रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या देशात 2,100 नाटो सैन्याच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine War: स्लोव्हाकियाच्या संसदेने रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या देशात 2,100 नाटो सैन्याच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दलात सुरुवातीला झेक प्रजासत्ताक, जर्मनी (Germany), नेदरलँड (Netherlands), युनायटेड स्टेट्स, पोलंड (Poland) आणि स्लोव्हेनियाचे सुमारे 1,200 सैनिक असणार आहेत. (In the country between Russia and Ukraine Slovakia parliament approved the deployment of NATO troops)

दरम्यान, स्लोव्हाकियाचे संरक्षण मंत्री जारोस्लाव नाद यांच्या म्हणण्यानुसार, 'भविष्यात युक्रेनमधील (Ukraine) उझहोरोड विमानतळाचा वापर रशियन सैन्य करणार आहे. त्यांच्यावर थेट लष्करी हल्ले होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे विमानतळ स्लोव्हाक सीमेजवळ आहे. संरक्षण मंत्री जारोस्लाव नाड यांनी ही माहिती टीएएसआर एजन्सीला दिली आहे.

खरं तर, सरकारने आधीच 9 मार्च रोजी नाटोच्या तैनातीला मान्यता दिली होती. त्याच वेळी, मंगळवारी उपस्थित 134 खासदारांपैकी 96 खासदारांनी या निर्णयाच्या बाजूने मतदान केले. तर 15 जणांनी विरोधात मतदान केले. 2004 मध्ये नाटोमध्ये सामील झाल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण सचिवांच्या पहिल्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी हे मतदान घेण्यात आली आहे.

त्याच वेळी, संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, 24 फेब्रुवारी रोजी रशियन आक्रमणानंतर 3 दशलक्षाहून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. त्याच वेळी, स्लोव्हाकियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून 200,000 लोक स्लोव्हाकियामध्ये आले आहेत. विशेष म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी रशियाने (Russia) युक्रेनविरुध्द युद्ध घोषित केले. हे युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धात युक्रेनची अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT