in a first indian pilot gopi thotakura takes off for a space tour on jeff bezos blue origin flight 
ग्लोबल

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Blue Origin Flight: अंतराळात प्रवास म्हणजे अवकाश पर्यटन! एकेकाळी जे स्वप्नवत वाटायचे ते आता खरे झाले आहे.

Manish Jadhav

Indian Pilot Gopi Thotakura: अंतराळात प्रवास म्हणजे अवकाश पर्यटन! एकेकाळी जे स्वप्नवत वाटायचे ते आता खरे होत आहे. ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्डने सप्टेंबर 2022 मध्ये एका रॉकेट दुर्घटनेनंतर अंतराळ पर्यटन थांबवल्यानंतर दोन वर्षांत प्रथमच रविवारी अवकाशात झेप घेतली. ब्लू ओरिजिनला त्याचे तंत्रज्ञान सुधारण्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पण आता ब्लू ओरिजिनचे NS-25 ने 19 मे रोजी (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता) अंतराळाच्या दिशेने उड्डाण केले. हे मिशन न्यू शेपर्ड प्रोग्रामसाठी सातवे मानवी उड्डाण असून त्याच्या इतिहासातील 25 वे आहे. या उड्डाणाची खास गोष्ट म्हणजे गोपी थोटाकुरा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय 'स्पेस टुरिस्ट' ठरले आहेत. तर, राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे थोटाकुरा हे दुसरे भारतीय ठरले आहेत.

दरम्यान, जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या ‘न्यू शेपर्ड -25’ (NS-25) मिशनसाठी निवडण्यात आलेल्या सहा क्रू सदस्यांमध्ये गोपीचंद थोटाकुरा हे भारतीय वंशाचे उद्योजक आणि पायलट आहेत. याशिवाय, क्रूमध्ये माजी हवाई दल कॅप्टन एड ड्वाइट हे युनायटेड स्टेट्समधील पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर आहेत. पश्चिम टेक्सासमधील लॉन्च साइट वन बेसवरुन सुरु करण्यात आलेल्या फ्लाइटची कंपनीने सोशल मीडियावर घोषणा केली होती.

थोटाकुरा यांच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, त्यांनी सुरुवातीचे शिक्षण बंगळुरुमधील सरला बिर्ला अकादमी या प्रायव्हेट स्कूलमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी फ्लोरिडा येथील एम्ब्री-रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटीमधून एरोनॉटिकल सायन्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली. विजयवाडा येथे जन्मलेल्या थोटाकुरा यांनी एमिरेट्स एव्हिएशन युनिव्हर्सिटी आणि कोव्हेंट्री युनिव्हर्सिटीमधून एमबीएची डिग्री देखील मिळवली.

थोटाकुरा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नसून ते पहिले भारतीय ‘स्पेस टुरिस्ट’ आहेत. पृथ्वीची सीमा ओलांडणारे पहिले भारतीय राकेश शर्मा होते, ज्यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सोयुझ टी-11 या अंतराळयानातून प्रवास केला होता. राकेश यांनी सल्युत-7 स्पेस स्टेशनमध्ये सात दिवस घालवले होते.

दुसरीकडे, थोटाकुरा यांच्याव्यतिरिक्त सहा क्रू सदस्यांमध्ये माजी पायलट एड ड्वाइट हे देखील आहेत. याशिवाय, इंडस्ट्रियस व्हेंचर्स या फर्मचे संस्थापक मेसन एंजेल हेही क्रू मेंबर्समध्ये आहेत. ब्रासेरी मॉन्ट ब्लँकचे संस्थापक क्राफ्ट ब्रुअरी हे देखील क्रूचा एक भाग आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि उद्योजक केनेथ एल हेस हेही या मिशनचा भाग आहेत. कॅरोल शॅलर हे सुद्धा या मिशनचा भाग आहेत.

सध्या अंतराळ पर्यटन महागले

अंतराळात पोहोचण्यासाठी प्रवाशाला साधारणपणे किमान एक दशलक्ष डॉलर्स द्यावे लागतात. ही रक्कम जवळपास प्रत्येकाच्या आवाक्याबाहेर आहे. शिवाय, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अंतराळ पर्यटनामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT