पाकिस्तान : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबीची जवळची मैत्रीण फराह खान देश सोडून परदेशात पळून गेली आहे. पाकिस्तानात नवे सरकार स्थापन झाल्यास तीला अटक होऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. मोठी गोष्ट म्हणजे फराह खान पाकिस्तानातून जवळपास 90 हजार डॉलर घेऊन पळून गेली आहे. त्यांचा विमानात बसलेला एक फोटोही व्हायरल झाला आहे. (Imran Khan's wife Bushra's friend fled abroad with mony)
फराहवर 6 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे
एक्सप्रेस ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे की ती रविवारी दुबईला रवाना झाली आणि तिचा पती एहसान जमील गुजर आधीच अमेरिकेला गेला आहे. अधिकार्यांच्या बदल्या आणि त्यांना इच्छित पद मिळवून देण्यासाठी फराहने मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सहा अब्ज पाकिस्तानी रुपयांचा मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
फराहने इम्रान आणि त्याची पत्नी - मरियम यांच्या सांगण्यावरून भ्रष्टाचार केला
पाकिस्तान (Pakistan) मुस्लिम लीग (एन) च्या उपाध्यक्षा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी दावा केला आहे की फराहने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून हा भ्रष्टाचार केला आहे. मरियमच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडल्यास त्यांची "चोरी" पकडली जाईल अशी भीती वाटते.
पंजाबचे (Punjab) नुकतेच बडतर्फ केलेले राज्यपाल चौधरी सरवर आणि इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांचे जुने मित्र आणि पक्षाचे फायनान्सर अलीम खान यांनीही फराहने पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्यामार्फत बदल्या आणि पोस्टिंगद्वारे कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप केला आहे. इम्रान खानचे आणखी जवळचे सहकारी देश सोडून जाण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
पाकिस्तानची संसद बरखास्त केली
नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने त्यांच्या (इमरान खान) विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला, त्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना संसद बरखास्त करण्याचा सल्ला दिला, राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी रविवारी संसद विसर्जित केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.