Imran Khan’s party wins most seats in PoK Legislative elections marred by violence: Opposition alleges ‘rigging’ Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांच्यावर धोकाधडीचा आरोप, विरोधी पक्ष जाणार कोर्टात

पीएमएल-एन पक्ष कोर्टात जाऊन या निकालाला आव्हान देण्यासाठी इम्रान खान(Imran Khan) यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचे विरोधी पक्षाने सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे(Pakistan) पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांच्यावर पाकयुक्त(POK)काश्मीरमध्ये (Kashmir) मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये (POK Elections) फेरफार केल्याचा आरोप पाकिस्तानचा मुख्य विरोधी पक्ष पीएमएल-एनने केला आहे.इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षावर टीका करणार्‍या देशातील सर्वोच्च विरोधी पक्ष (पीएमएल-एन)ने इम्रान खान विरोधात कोर्टात जाण्याचा विचार देखील केला आहे. निवडणुकीत सरकारी यंत्रणा वापरल्याचा आरोप पाकिस्तानातील विरोधी पक्षाने केला आहे.

"निवडणुकीचा निकाल मी स्वीकारला नाही ... आणि मी तो स्वीकारणारही नाही.” मी २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकांचाही निकाल स्वीकारला नव्हता. हे सरकार फसवणूक करत पाकयुक्त काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत लाजिरवाणी सरकारी धोरण आखले होते आणि पीएमएल-एन याबद्दल लवकरच आपली रणनीती जाहीर करणार असल्याचे पीएमएल-एनचे उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी सांगितले आहे.

विरोधी पक्षाने पाकयुक्त काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने 45 पैकी 25 जागा जिंकल्या आहेत.रविवारी झालेल्या निवडणुकीत पीटीआयने 25 जागा जिंकल्या आणि त्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) 11 जागांवर, पीएमएल-एन सहा आणि दोन प्रादेशिक राजकीय पक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकल्याया आहेत.

पीएमएल-एन पंजाबचे माहिती सचिव आझम बुखारी यांनी इम्रान खान यांच्याकडे कटाक्ष टाकत म्हटले आहे की 25 जुलै हा दिवस देशातील मतदान-चोरांच्या धोरणाचा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल.

पीएमएल-एनचे नेते आझम बुखारी यांनी ट्वीट केले की, "25 जुलै हा दिवस देशातील मत चोरांद्वारे केलेल्या धांधलीचा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल. निवडणुकीची धांदल उडाली पाहिजे यासाठी बुजदार प्रशासनाने पंजाबमधून पोलिस, शिक्षक, मतदान आणि इतर प्रशासकीय कर्मचारी काश्मीर (पीओके) येथे पाठवले. मतदानाला भाग पाडण्यासाठी पंजाब सरकारने उघडपणे आपल्या यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यासह, पाकयुक्त काश्मीरच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले सरदार तनवीर इलियासही या साऱ्या गोंधळात सहभागी असल्याचा आरोप पीएमएल-एनने केला आहे. ते म्हणाले, "राज्यकर्ते एखाद्याचे वैयक्तिक नोकर कसे बनले आहेत याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटते." आजम बुखारी यांनी गुलाम काश्मीरच्या (पीओके) लोकांना इशारा दिला की पीटीआय सरकार त्यांचे जीवन दयनीय बनवेल.

पीएमएल-एन पक्ष कोर्टात जाऊन तोडफोडीला आव्हान देण्यासाठी निषेध करण्याचा विचार करीत आहे असल्याचे विरोधी पक्षाने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Konkani Language: 38 वर्षांत राजपत्र कोकणीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही कुठल्या सरकारला करता आला नाही; भाषा अभिमान आणि वास्तव

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT