Noreen Niazi Dainik Gomantak
ग्लोबल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Noreen Niazi Imran Khan Sister Interview: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण नोरिन नियाझी यांच्या एका खळबळजनक विधानाने पाकिस्तानच्या राजकारणात आणि लष्करी वर्तुळात खळबळ उडवून दिली.

Manish Jadhav

Noreen Niazi Imran Khan Sister Interview: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण नोरिन नियाझी यांच्या एका खळबळजनक विधानाने पाकिस्तानच्या राजकारणात आणि लष्करी वर्तुळात खळबळ उडवून दिली. लष्करप्रमुख असीम मुनीरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान झालेला आपला पराभव लपवण्यासाठी भारताबद्दल असत्य दावे केल्याचा गंभीर आरोप नियाझी यांनी केला.

एका मुलाखतीदरम्यान त्यांनी उघडपणे सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने जगासमोर मांडलेले चित्र पूर्णपणे खोटे असून भारताचे 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी ठरले होते. पाकिस्तानी लष्कर केवळ आपली नाचक्की आणि पराभव लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते, असा दावा त्यांनी केला.

नोरिन नियाझी यांच्या या थेट आरोपानंतर पाकिस्तान (Pakistan) सरकार आणि लष्कर समर्थकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत, यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय हिताला आणि सैन्याच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचल्याचे म्हटले. या वादग्रस्त मुलाखतीनंतर काही तासांतच पाकिस्तानच्या 'नॅशनल सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी'ने नोरिन नियाझी यांना समन्स बजावले. सरकारी संस्था आणि लष्कराची अपकीर्ती करणे, तसेच सोशल मीडियावरुन खोटा प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

मुलाखतीत नियाझी यांनी कोणताही सबळ पुरावा न देता आणखी एक वादग्रस्त दावा केला. त्यांच्या मते, इस्रायलच्या हस्तक्षेपामुळे भारताने हा संघर्ष अधिक ताणला नाही. भारताची इच्छा होती की, पाकिस्तानने इस्रायलला एक देश म्हणून मान्यता द्यावी आणि 'अब्राहम करारात' सहभागी व्हावे, असा अजब दावा त्यांनी केला. वास्तविक पाहता, पाकिस्तानने इस्रायलला अधिकृत देश म्हणून कधीही मान्यता दिलेली नाही आणि त्यांच्यात कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत.

2020 मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या अब्राहम करारांतर्गत इस्रायल आणि काही अरब देशांमध्ये राजनैतिक व आर्थिक संबंध प्रस्थापित झाले होते. मात्र, नोरिन नियाझी यांनी केलेल्या या राजकीय वक्तव्यांमुळे सध्या पाकिस्तानात गृहकलह निर्माण झाला असून लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT