Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: 'मला इंजेक्शन देऊन...', इम्रान खान यांचा न्यायालयात खळबळजनक दावा

Former Pakistan PM Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या हत्येची भीती व्यक्त केली आहे.

Manish Jadhav

Former Pakistan PM Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या हत्येची भीती व्यक्त केली आहे. मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आल्यानंतर इम्रान खान यांना आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

येथे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने इम्रान खान यांची 14 दिवसांची कोठडी मागितली. दरम्यान, इम्रान खान यांनी न्यायालयात खळबळजनक दावा केला.

माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याचे त्यांनी सांगितले. इम्रान म्हणाले की, मला इंजेक्शन देऊन मारले जाऊ शकते.

दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे नेते शेख रशीद यांनीही मंगळवारी सांगितले की, 'त्यांच्या नेत्याची हत्या होऊ शकते.' इम्रान खान यांनी हत्येची भीती व्यक्त केल्यानंतर लष्कर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपण नाटक करत असल्याचे म्हटले असले तरी.

दुसरीकडे, बुधवारी इम्रान खान यांना इस्लामाबाद (Islamabad) पोलीस लाईनमध्येच स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

येथे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने सांगितले की, जमीन घोटाळ्याप्रकरणी इम्रान खान यांची चौकशी करण्यासाठी 14 दिवसांची कोठडी आवश्यक आहे.

त्यावर, न्यायालयाने सुनावणी घेऊन निकाल राखून ठेवला. दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षांच्या नेत्यांवर पोलिसांची कारवाई सुरुच आहे.

इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते असद उमर यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. इतकेच नाही तर त्यांना अटक करण्यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे पीटीआय नेते शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले.

तसेच, असद उमर यांच्या अटकेलाही त्यांनी दुजोरा दिला. शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, 'या लोकांनी असद उमर साहब यांना अटक केली आहे. पण मी तिथून पळ काढला आणि न्यायालयात शिरलो. आता मी सुरक्षित ठिकाणी असून तिथून माझा संदेश रेकॉर्ड करत आहे.'

अटक टाळण्यासाठी कुरेशी न्यायालयात दाखल झाले

शाह मेहमूद कुरेशी यांनी आपल्या संदेशात इम्रान खान समर्थकांना इस्लामाबादमध्ये पोहोचून आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, सरकार सातत्याने कडक कारवाई करत आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाब प्रांतात लष्कराला रस्त्यावर उतरवण्यात आले आहे.

याशिवाय, खैबर पख्तुनख्वामध्येही लष्कर तैनात करण्यात येत आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, पेशावरमधील आर्मी कँट, रेडिओ पाकिस्तानवर इम्रान समर्थकांनी हल्ला केला आहे. याशिवाय, पंजाबमधील लाहोर, रावळपिंडी यांसारख्या शहरांमध्येही प्रचंड अशांतता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT