Fawad Chaudhry Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Political Crisis: पाकिस्तानची दैना! इम्रान खान यांच्या निकवर्तीयाने पोलिसांना...; पाहा Video

Pakistan Political Crisis: पाकिस्तानातील इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर मंगळवारी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.

Manish Jadhav

Pakistan Political Crisis: पाकिस्तानातील इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर मंगळवारी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते फवाद चौधरी सुटल्यानंतर न्यायालयाच्या दिशेने पळताना दिसले.

खरे तर, उच्च न्यायालयाने पीटीआय नेते चौधरी यांच्या सुटकेचे आदेश देताच ते न्यायालयामधून बाहेर आले.

फवाद चौधरी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीमध्ये बसले, पण त्याच दरम्यान त्यांची नजर न्यायालयाबाहेर तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर पडली. हे पाहून त्यांनी पटकन कारचा दरवाजा उघडला आणि न्यायालयाच्या दिशेने धाव घेतली.

डॉनच्या वृत्तानुसार, चौधरी यांना अन्य एका प्रकरणात अटक करण्यासाठी पोलीस (Police) न्यायालयाबाहेर पोहोचले होते. यानंतर काही वेळातच पीटीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये फवाद चौधरी वकिलांसह न्यायालयात जाताना दिसत आहेत.

फवाद यांना पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या इतर नेत्यांसह जाळपोळ आणि हिंसक निदर्शने भडकवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुनियोजित रणनीती अंतर्गत शांतता धोक्यात आणल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इस्लामाबाद (Islamabad) उच्च न्यायालयाबाहेर पाकिस्तानी रेंजर्सनी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर निदर्शनांदरम्यान हिंसाचार झाला होता.

इम्रान खान यांच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवण्यात आला आहे

दुसरीकडे, लाहोर उच्च न्यायालयाने मंगळवारी इम्रान खान यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

गेल्या आठवड्यात इम्रान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या वतीने झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

खान यांनी शनिवारी ही याचिका दाखल केली होती. एक दिवस आधी त्यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामिनावर सुटका करण्यात आली होती.

पंजाबच्या अंतरिम सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने जामीन अर्जाला विरोध केला आणि तो मंजूर करु नये असे सांगितले. शुक्रवारी जामीन मंजूर होऊनही, खान यांच्या अटकेच्या भीतीने न्यायालयाच्या आवारातून तासन्तास बाहेर पडता आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

SCROLL FOR NEXT