Former Pakistan PM Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan Net Worth: कंगाल PAK चा करोडपती PM, इम्रान यांच्या संपत्तीबद्दल जाणून तुम्हीही म्हणाल...

Imran Khan Net Worth: पाकिस्तानातील गरिबीची स्थिती कोणापासून लपलेली नाही. महागाईने कहर केला आहे. कंपन्या बंद होत आहेत किंवा देश सोडून जात आहेत.

Manish Jadhav

Imran Khan Net Worth: पाकिस्तानातील गरिबीची स्थिती कोणापासून लपलेली नाही. महागाईने कहर केला आहे. कंपन्या बंद होत आहेत किंवा देश सोडून जात आहेत.

आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर पाकिस्तानमध्ये हे प्रकरण अधिकच तापले आहे.

तर दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तानी रुपयातही विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, जर तुम्हाला पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या संपत्तीबद्दल माहिती असेल तर तुम्ही वाह इम्रान जी वाह म्हणाल.

इम्रान यांना गरीब पाकिस्तानचे श्रीमंत पंतप्रधान म्हटले तर नवल काहीच नाही. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याकडे किती संपत्ती आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

600 एकर जमिनीचे मालक

इम्रान खान हे पाकिस्तानचे (Pakistan) करोडपती माजी पंतप्रधान आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्याकडे जवळपास 600 एकर जमीन आहे.

इम्रान खान हे माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी आहेत. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, 16 मार्च 2023 पर्यंत इम्रान खान यांची संपत्ती 410 कोटी आहे.

राजकारणाव्यतिरिक्त इम्रान खान एक कुशल व्यापारी आणि गुंतवणूकदार देखील आहेत. दुसरीकडे, मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर, इम्रान खान यांच्याकडे 600 एकर शेती आणि अकृषिक जमिनी आहेत. बँक खात्यात करोडो रुपये आहेत.

त्याचबरोबर, इम्रान जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यावेळच्या वृत्तानुसार, इम्रान यांच्याकडे बँक खात्यांमध्ये सुमारे 6 कोटींची रक्कम दाखवण्यात आली होती.

अफाट संपत्तीचे मालक असलेल्या इम्रान यांच्याकडे हेलिकॉप्टरही आहे. मात्र, वाहनाबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या नावावर एकही वाहन नोंदणीकृत नाही.

तसेच, पाकिस्तान व्यतिरिक्त इम्रान खान यांची परदेशातही बॅंक अकाऊंट आहेत. या विदेशा अकाऊंटमध्ये सुमारे 3 लाखांहून अधिक डॉलर्स आहेत.

याशिवाय, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचा इस्लामाबादमध्ये एक आलिशान व्हिला आहे. इम्रान यांचा हा व्हिला 1.81 लाख स्क्वेअर यार्डमध्ये पसरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

क्रिकेट विश्वावर शोककळा! रणजी क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू, बॅटिंगनंतर छातीत दुखू लागले अन्...

Kushavati District: ‘कुशावती’बाबत नवीन अपडेट! भाडेकरू, हॉटेल कामगारांच्या पडताळणीचे आदेश; ओळखपत्राची सक्ती

SCROLL FOR NEXT