Prime Minister Narendra Modi & Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा इम्रान खान पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू ; पाक संरक्षणमंत्री

पाकिस्तानला भारतापेक्षा पीटीआय प्रमुखांच्या बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. - पाक संरक्षणमंत्री

Pramod Yadav

Khawaja Muhammad Asif: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा एम आसिफ यांनी इम्रान खान यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इम्रान खान ( Imran Khan) हे पाकिस्तानचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इम्रान हे मोदींपेक्षा जास्त धोकादायक असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

एका पाकिस्तानी मीडिया वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री यांनी हे वक्तव्य केले आहे. तुम्हाला तुमचा विदेशातील शत्रू माहीत आहे. पण जो आपल्याच देशात जन्माला आला तो भारतापेक्षा मोठा शत्रू आहे. नरेंद्र मोदींपेक्षा इम्रान खानचा पाकिस्तानला मोठा धोका आहे.

सध्यातरी, पाकिस्तानला भारतापेक्षा पीटीआय प्रमुखांच्या बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पाकिस्तानचे शत्रू आहेत, त्यांना तर सारा देश चांगले ओळखतो. पण जे देशामध्येच शत्रू म्हणून लपून बसले आहेत ते आमच्यासाठी जास्त धोकादायक आहेत. इम्रान खान त्यापैकीच एक आहे. असे ख्वाजा एम आसिफ यांनी म्हटले आहे.

अँकरने जेव्हा त्यांना इम्रान खान मोदींपेक्षा जास्त धोकादायक आहेत का? असे विचारले, त्यावर संरक्षण मंत्री म्हणाले, "नक्कीच इम्रान खान कितीतरी पटीने धोकादायक आहे. लोकांना इम्रान खानची वास्तविकता कळू शकलेली नाही. 9 मे रोजी इम्रान खानने देशाविरुद्ध बंड केले."

हिंसाचार भडकावल्याप्रकरणी इम्रानचा खटला लष्करी न्यायालयात चालवला जाईल. असे शाहबाज शरीफ सरकारमधील मंत्री मियां लतीफ यांनी गुरूवारी सांगितले. या हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 300 महिलांसह एकूण 12 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 33 जणांना लष्कराच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पीटीआयचे अध्यक्ष चौधरी परवेझ इलाही यांनाही अटक करण्यात आली आहे. लाहोरच्या त्यांच्या घराबाहेरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. 9 मेच्या हिंसाचारापासून ते लपून बसला होता. यापूर्वी इम्रानचे काही साथीदार देश सोडून पळून गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: विधानसभेत विधेयकांचा 'पंच'! शिक्षण, कृषी, व्यापार अन् पंचायतींसाठी कायदे मंजूर; अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याच्या हिताचे मोठे निर्णय

Operation Sindhur: 'ऑपरेशन सिंदूर'चा थरार! भारतीय लष्कराने जारी केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ; पाकच्या एअरबेस आणि रडार यंत्रणेच्या विध्वंसाचा पुरावा जगासमोर

"ऑपरेशन सिंदूर सर्वात मोठा हल्ला, अल्लाहनचं आम्हाला वाचवलं," लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरची जाहीर कबुली; पाकड्यांचा पुन्हा बुरखा फाटला

Goa Winter Session 2026: "आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं; मतदार यादीतून गैर-नागरिकांची नावं हटवणार

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

SCROLL FOR NEXT