Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: तोशाखाना प्रकरणात इम्रान खानला मोठा दिलासा, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शिक्षेला दिली स्थगिती!

Imran Khan's Conviction Suspended in Toshakhana Case: इम्रान खान यांना 5 ऑगस्ट रोजी 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ते सध्या अटॉक जिल्हा कारागृहात कैद आहेत.

Manish Jadhav

Imran Khan's Conviction Suspended in Toshakhana Case: तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती देताना त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

इम्रान खान यांना 5 ऑगस्ट रोजी 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ते सध्या अटॉक जिल्हा कारागृहात कैद आहेत.

दरम्यान, तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान यांनी शिक्षेविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाने सोमवारी निर्णय राखून ठेवला होता, तर आता मंगळवारी निर्णय दिला आहे.

न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत माजी पाकिस्तानी पंतप्रधानांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिले.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नुकतेच सुटकेचे आदेश दिले आहेत, लवकरच एक सविस्तर आदेश जारी केला जाईल, ज्यामध्ये इम्रान खान जाहीर सभा घेऊ शकतात की नाही आणि ते पुढे जाऊन निवडणूक लढवू शकतात की नाही हे कळेल.

इम्रान खान यांच्यावर काय आरोप होते?

खरे तर, इम्रान खान (Imran Khan) यांनी पंतप्रधान असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशाखाना विभागाला दिली नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता. एवढेच नाही तर त्यांनी अनेक गिफ्ट्ससाठी बोली लावली होती.

पाकिस्तानात असा नियम आहे की, पंतप्रधानपद भूषवताना एखादी भेटवस्तू मिळाली तर ती सरकारची मालमत्ता असल्याने ती तोशाखाना खात्यात जमा करावी लागते. 2022 मध्ये जेव्हा पाकिस्तानमध्ये सरकार बदलले तेव्हा इम्रान यांच्याविरोधातील हे प्रकरण उघडकीस आले.

दुसरीकडे, शाहबाज सरकारने जाणीवपूर्वक त्यांना खोट्या खटल्यात अडकवल्याचा आरोप इम्रान खान आणि त्यांचा पक्ष सातत्याने करत होता.

पाकिस्तानात सध्या काळजीवाहू सरकार आहे, कारण शाहबाज शरीफ यांनी संसद (Parliament) बरखास्त केली होती. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणाही होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: चिमुकल्याने घरच्या घरी बनवली 'गणेशमूर्ती'! विसर्जनानंतर मातीचाही उपयोग; विधायक गणेशोत्सव

Goa Live Updates: मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीच्या दौऱ्यावर

Goa OBC Quota: सरकारी खात्यांमधील ओबीसी कोटा भरणार कधी? विविध खात्यांमधील 549 पदे रिक्त

पैसे संपले म्हणून उधार घेण्यासाठी गोव्यातून परत आला; विद्यार्थिनीवर बलात्कारचा प्रयत्न करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Goa Eggs Price: ब्रॉयलर ‘अंड्यां’चा भाव वाढला! शेकड्यावर 100 रुपये चढ, गावठी अंडी 250 रुपये डझन

SCROLL FOR NEXT