Imran Khan arrested Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan Arrested: कलम 144, इंटरनेट बंद... इम्रानच्या अटकेनंतर पाकिस्तानात वाढला हिंसाचार, 10 मुद्दे

इम्रान खानला इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर कलम 144 लागू करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Political Crisis Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना (9 मे) पाकिस्तानी रेंजर्संनी अटक केली.

इस्लामाबाद उच्च न्यायालयात उपस्थित असताना त्यांना पाकिस्तानी रेंजर्संनी ताब्यात घेतले. त्यानंतर देशातील राजकीय परिस्थीती वेगाने बदलली. इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर येण्याचे आवाहन केले.

इम्रान खानच्या अटकेनंतर राजधानी इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी इस्लामाबादमध्ये आतापर्यंत हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही.

इम्रान खान यांच्यावर देशद्रोह, दहशतवाद आणि हिंसाचार भडकवण्याचे आरोप आहेत. इस्लामाबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी इम्रान लाहोरहून आला होता.

इम्रानची कोर्टात बायोमेट्रिक प्रक्रिया सुरू असताना लष्कराच्या जवानांनी कोर्टाची खिडकी तोडून आणि वकील, सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करून खानला अटक केली.

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांच्या म्हणण्यानुसार, माजी पंतप्रधानांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरण समजून घ्या...

  • इम्रान खान भ्रष्टाचार प्रकरणी सुनावणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात गेला, तेव्हा लष्कराने हल्ला करून त्यांना अटक केली. इम्रानच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी अनेक शहरांमध्ये हिंसाचार तीव्र केला आहे. 

  • बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा येथे आंदोलक आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर कराची, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये अशाच हिंसाचारात सुमारे 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

  • इम्रान खानच्या अटकेनंतर राजधानीत कलम 144 लागू करण्यात आले आहे . ट्विटरसह सर्व सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. याशिवाय बुधवार 10 मे रोजीही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

  • इम्रानच्या सुमारे 4,000 समर्थकांनी लाहोरमधील सर्वोच्च कमांडरच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला. आंदोलकांनी पोलिसांची वाहने जाळली आणि प्रमुख रस्ते अडवले.

  • खान समर्थक घोषणा देण्याबरोबरच आंदोलकांनी रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाचीही तोडफोड केली. 

  • इस्लामाबाद पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मिळालेल्या माहितीनुसार, इम्रानला अल कादिर ट्रस्ट प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळावा यासाठी इम्रान कोर्टात गेला होता. तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे वरिष्ठ नेते फवाद चौधरी यांनी 71 वर्षीय माजी क्रिकेट स्टारच्या अटकेचे वर्णन "अपहरण" असे केले आहे. 

  • पोलीस आणि सरकारी अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खानला राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरोच्या कार्यालयात चौकशीसाठी इस्लामाबादजवळील रावळपिंडी येथील गॅरिसन टाउनमध्ये नेण्यात आले. याशिवाय त्यांची वैद्यकीय तपासणीही होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • सूत्रांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, भारतीय लष्कर पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. याशिवाय सीमेवर लष्कराकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

  • माजी पंतप्रधान खान यांचे प्रकरण रिअल इस्टेट व्यावसायिकाशी संबंधित आहे. ज्यामध्ये दोघांमधील करारामध्ये देशाच्या तिजोरीचे अनेक कोटींचे नुकसान झाले होते. 

  • खान यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही अटक केली जाऊ शकते, असे संकेत पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी दिले आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: एफडीएच्या अचानक तपासणी मोहिमेत अनेक दुकाने बंद

SCROLL FOR NEXT