Cyclone Mocha Dainik Gomantak
ग्लोबल

Cyclone Mocha: मोचा चक्रीवादळ बांगलादेश, म्यानमार किनारपट्टीला धडकण्याची शक्यता, 4 लाख लोकांची सुटका

वादळ ताशी 240 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि 12 फुटांपर्यंत समुद्राच्या लाटा उसळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Pramod Yadav

Cyclone Mocha: मोचा चक्रीवादळ बांगलादेश, म्यानमार किनारपट्टीला धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, सतर्कता म्हणून चार लाख लोकांची सुटका करण्यात आली आहे.

वादळ ताशी 240 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि 12 फुटांपर्यंत समुद्राच्या लाटा उसळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. किनारपट्टी लगतच्या हजारो लोकांना या वादळाचा फटका बसू शकतो.

मोचा बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकले तर मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फटका बसू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या उपग्रह केंद्राने दिला आहे.

वादळ दुपारच्या सुमारास धडकण्यापूर्वी सुमारे 300,000 लोकांना धोका असलेल्या भागातून बाहेर काढले आहे. असे बांगलादेशातील आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

चक्रीवादळाच्या मार्गाजवळ असलेल्या कॉक्स बाजारच्या समुद्रकिनारी शहरातील छावण्यांमध्ये दहा लाखांहून अधिक रोहिंग्या निर्वासित राहत आहेत. या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली जात असून, सुरक्षेसाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापासून म्यानमारच्या विविध राज्यातील सुमारे 100,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. शहरातील मठ आणि शाळांचा निवारा म्हणून वापर केला जात आहे. निर्वासितांसाठी स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने जेवणाची व्यवस्था केली जात आहे.

म्यानमार एअरवेज इंटरनॅशनलने राखीन राज्याकडे जाणारी त्यांची सर्व उड्डाणे सोमवारपर्यंत स्थगित केली आहेत. बांगलादेशातील सर्वात मोठे बंदर चितगाव येथील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. बोटी वाहतूक आणि मासेमारीवरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये देखील मोचा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सतर्क करण्यात आले आहे. स्थानिक लोकांच्या सुरक्षेसाठी दक्षिण 24 परगणा येथील बक्खली बीचवर नागरी संरक्षण दल तैनात करण्यात आले आहे. नागरी संरक्षण दल सतत्याने लोकांना सतर्क केले जात असून, पर्यटकांना समुद्राजवळ जाण्यापासून रोखले जात आहे.

यापूर्वी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ने पश्चिम बंगालमधील दिघा येथे चक्रीवादळ मोचाच्या अलर्टनंतर आठ टीम आणि 800 बचाव कर्मचारी तैनात केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्यातील खाण कामगार, खनिज वाहतूकदारांना काम मिळणार; 10 दहा ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव होणार

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

SCROLL FOR NEXT