Ilhan Omar  Dainik Gomantak
ग्लोबल

'मोदी सरकार अल्पसंख्यांक विरोधी'; अमेरिकन मुस्लिम खासदाराचा आरोप

उमर यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारला (Indian Government) अल्पसंख्याक विरोधी म्हटले.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेच्या महिला खासदार इल्हान उमर यांनी भारताला अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या प्रशासनावर सवाल उपस्थित केले आहेत. उमर यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारला (Indian Government) अल्पसंख्याक विरोधी म्हटले. भारताविरोधात बोलताना उमर यांनी आरोप केला की, ''देशात मुस्लिम अल्पसंख्याकांविरोधात मोठी मोहीम चालवली जात आहे.'' (Ilhan Omar a US woman MP has called the Indian government anti-minority)

उप परराष्ट्रमंत्र्यांना विचारले - मोदी सरकारला पाठिंबा कसा काय

ओमर यांनी बायडन प्रशासनाच्या उप परराष्ट्र सचिव वेंडी शर्मन यांना प्रश्न केला की, अमेरिकन सरकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला "मुक्त आणि मुक्त प्रदेशाचा प्रचार" करण्यासाठी कसे समर्थन करत आहे. अमेरिकन काँग्रेसवुमननेही विविध देशांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करुन हा ऐतिहासिक अन्याय असल्याचे म्हटले आहे.

भारत सरकारने मुस्लिम असणे हा गुन्हा ठरवला आहे

उमर यांनी आरोप केला की, ''मोदी प्रशासन भारतात मुस्लिम असणे हा गुन्हा ठरवत आहे. मुस्लिम अल्पसंख्याकांविरुद्ध मोदी सरकार करत असलेल्या कारवाईवर बाहेरुन टीका करण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल,'' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बायडन प्रशासन मोदी सरकारवर टीका करण्याचं टाळतयं

दुसरीकडे, अमेरिकेचे डेप्युटी स्टेट सेक्रेटरी शर्मन यांनी ओमर यांना समजवण्याचा प्रयत्न केला. "मी सहमत आहे की, बायडन प्रशासनाने जगातील विविधतेच्या प्रत्येक गुणवत्तेसाठी उभे राहिले पाहिजे.''

ओमर यांनी ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, 'बायडन प्रशासन मानवाधिकारांसाठी मोदी सरकारवर टीका करणे का टाळत आहे?'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

SCROLL FOR NEXT