General John E. Houghton Dainik Gomantak
ग्लोबल

जर रशिया किंवा चीनशी युद्ध झाले तर... अमेरिकन जनरलने दिला इशारा

अमेरिकेचे व्हाईस जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल जॉन ई ह्यटन (General John E. Houghton) यांनी ब्रूकिंग्ज इन्स्टिट्यूशन येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना या धोक्यासंबंधी जगाला पुन्हा एकदा अवगत केले आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिका-रशिया (US-Russia) आणि अमेरिका-चीन (US-China) यांच्यात राजकीय तणावाबरोबर आर्थिक तणाव एक वर्षाहून अधिक काळ चालला आहे. अणुऊर्जेने सशस्त्र (Nuclear Power) असलेल्या या शक्तींमधील युद्ध (War) जगाचा नाश करु शकते. जिथे अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पूर्वी ही वस्तुस्थिती स्वीकारली होती, आता या संदर्भात एका अमेरिकन जनरलकडून चेतावणी देण्यात आली आहे. तिन्ही देश अणवस्त्र संपन्न आहेत. रॉकेट आणि क्षेपणास्त्रांपासून या तिन्ही देशांकडे सर्व प्रकारची आधुनिक शस्त्रे प्रक्षेपित करण्याची शक्ती आहे. अशा परिस्थितीत जर त्यांच्यातील तणाव वाढला तर काय होईल, या गोष्टीचा फक्त अंदाज लावला जाऊ शकतो. अमेरिकेचे व्हाईस जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल जॉन ई ह्यटन यांनी ब्रूकिंग्ज इन्स्टिट्यूशन येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना या धोक्यासंबंधी जगाला पुन्हा एकदा अवगत केले आहे. ही संस्था एक थिंक टँक आहे.

शांतपणे विचार करणे आवश्यक

वॉशिंग्टनस्थित थिंक टँकने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना जनरल जॉन यांनी इशारा दिला की, जर रशिया आणि चीनसोबत कोणत्याही प्रकारचे युद्ध झाले तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. ते पुढे म्हणाले की, रशिया किंवा चीनशी कोणत्याही प्रकारचे संघर्ष टाळण्यासाठी अमेरिका निश्चितच शांत चित्ताने विचार करेल. जनरल जॉनच्या शब्दात सांगायचे झाल्यास, 'आम्ही सोव्हिएत युनियनशी कधीही लढलो नाही. महासत्ता म्हणून, हे नेहमीच आमचे ध्येय राहिले आहे की, कधीही चीन आणि रशियासोबत युध्दजनक परिस्थिती निर्माण होऊ नये.

रशियाकडून कोणताही धोका नाही पण ...

जनरल हाईटन पुढे म्हणाले, 'अशा युध्दजनक घटना जगाचा नाश करतील, तसेच जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आणतील.' जर तिन्ही देशांमध्ये युध्दजनक परिस्थिती निर्माण झाली तर जगावर त्याचे खूप घातक परिणाम होतील.

तथापि, ते असेही म्हणाले की सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर रशियाचा आता अमेरिकेला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. या व्यतिरिक्त, ते हे सांगायला विसरले नाहीत की, रशियाचे सैन्य आता त्यांच्या अण्वस्त्रांच्या शस्त्रास्त्राचे आधुनिकीकरण करत आहेत आणि ही गोष्ट अमेरिकेसाठी त्रासदायक आहे.

चीनला रोखणे अशक्य

ते पुढे म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या दिशेने काही प्रगती झाली आहे, परंतु हे पुरेसे नाही. अजून बराच पल्ला गाठायचा आहे जेणेकरुन प्रदेशात स्थिरता राहील. चीनचा आण्विक खजिना आता सर्वांसमोर येत आहे. ते पुढे म्हणाले की, रशियाने आपली अण्वस्त्रे केवळ मर्यादेपर्यंत वाढवली आहेत. परंतु चीनच्या बाबतीत असे नाही आणि ते अण्वस्त्र क्षमतेने सज्ज असलेल्या पाणबुडीपासून आंतर महाद्वीपीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापर्यंत प्रत्येक शस्त्र वेगाने बनवत आहे. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये रशियाच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला दोष दिला. ते म्हणाले की, धोका रशियामुळे नाही तर व्हाईट हाऊसच्या धोरणांमुळे निर्माण केला जात आहे. युरोपमध्ये तैनात अमेरिकन अण्वस्त्रांची तैनाती पाहता त्यांनी हे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT