PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hezbollah Tensions: ''चिथावणी दिल्यास तात्काळ हल्ला करु...''; इस्रायलची हिजबुल्लाला खुली धमकी

Israel-Hezbollah Tensions: इस्त्रायली सैन्याने शेजारच्या लेबनॉनमधील हिजबुल्लाला आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला आहे.

Manish Jadhav

Israel-Hezbollah Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, इस्त्रायली सैन्याने शेजारच्या लेबनॉनमधील हिजबुल्लाला आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला आहे. इस्त्रायलने म्हटले की, चिथावणी दिल्यास त्वरित हल्ला करु. यासोबतच इस्रायली लष्कराने गाझामधील चार महिने चाललेल्या युद्धादरम्यान उत्तर सीमेवरील हिजबुल्लाच्या कारवायांचा उल्लेख केला आणि या दहशतवादी गटाच्या विरोधात सीरियात अनेक हवाई हल्ले केल्याची कबुलीही दिली.

इस्त्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, "युद्ध हे आमचे पहिले प्राधान्य नाही, परंतु आम्ही निश्चितपणे तयार आहोत. जिथे जिथे हिजबुल्ला आहे तिथे आम्ही कारवाई करत राहू, पश्चिम आशियात जिथे जिथे गरज असेल तिथे आम्ही कारवाई करत राहू."

दरम्यान, हमासविरुद्ध युद्धविरामाचा अर्थ असा नाही की गरज असल्यास इस्रायल हिजबुल्लावर हल्ला करणार नाही. दुसरीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका, इजिप्त, कतार आणि इस्रायलने दिलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करत असल्याचे हमासचे वरिष्ठ अधिकारी ओसामा हमदान यांनी सांगितले. त्याचबरोबर, कायमस्वरुपी युद्धविरामासह इस्रायल अनेक अटी मान्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. हमास शासित गाझामधील युद्धामुळे तेथील 85 टक्के लोक विस्थापित झाले आहेत.

गाझामधील आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत 107 लोकांचा मृत्यू झाला असून, या युद्धात आतापर्यंत मृतांची संख्या 27,238 झाली आहे. 66,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अबू युसूफ अल-नज्जर रुग्णालयाच्या नोंदणी कार्यालयानुसार गाझाच्या दक्षिणेकडील रफाह शहरात रात्रभर दोन वेगवेगळ्या हवाई हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह किमान 17 लोक ठार झाले. रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहिला हल्ला एका निवासी इमारतीवर करण्यात आला, ज्यामध्ये एका कुटुंबातील किमान 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT