Imran Khan & Shahbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान सत्तेतून पायउतार झाल्यास शाहबाज शरीफ होणार पंतप्रधान?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलं आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याचा सभापतींचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिलाय. अविश्वास प्रस्तावावर फेरमतदान करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. विरोधी गटांनी रविवारी संसदेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, मात्र इम्रान खान (Imran Khan) अजूनही संसदेत गैरहजर होते. (If Imran Khan steps down, Shahbaz Sharif may become PM)

दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी विरोधी पक्षांना 342 सदस्यांच्या सभागृहात 172 सदस्यांची गरज आहे. 177 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा विरोधकांचा दावा आहे. या प्रस्तावावर आज सभागृहात चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी अविश्वास प्रस्तावाला परकीय षडयंत्र म्हटल्याबद्दल सभापतींवर संतापले. संविधानाच्या मार्गावर चालण्याची विनंती त्यांनी सभापतींना केली. या संपूर्ण प्रकरणात इम्रान खान यांच्यानंतर सर्वांच्या नजरा शाहबाज शरीफ यांच्याकडे लागल्या आहेत. इम्रान खान सरकार पडल्यानंतर पीएमएल (Nawaz) नेते शाहबाज शरीफ पंतप्रधान होऊ शकतात, असे मानले जात आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. शाहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यास नवाझ शरीफ पाकिस्तानात परत येऊ शकतात.

शाहबाज शरीफ यांच्याबद्दल काही खास गोष्टी, कोण आहेत ते?

इम्रान खान यांच्या विरोधातील प्रचाराचा प्रमुख चेहरा शाहबाज शरीफ हे तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांचे बंधू आहेत. शाहबाज शरीफ हे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर अबी हे पाकिस्तान मुस्लिम लीगचे (Nawaz) अध्यक्ष आहेत. शाहबाज यांना सर्वाधिक काळ पंजाबचे मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळाला आहे. त्यांनी तीन वेळा हे पद भूषवले आहे. 1997 मध्ये ते पहिल्यांदा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री बनले. 1999 मध्ये परवेज मुशर्रफ यांच्या सत्तापालटानंतर त्यांना पाकिस्तान सोडावे लागले आणि सौदी अरेबियात आठ वर्षे वनवास भोगावा लागला.

याशिवाय, शाहबाज आणि त्यांचे भाऊ 2007 मध्ये पाकिस्तानात परतले होते. लगेच 2008 च्या निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर शाहबाज पंजाबचे मुख्यमंत्री झाले. तिसर्‍यांदा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शाहबाज यांचा कार्यकाळ 2013 मध्ये सुरु झाला आणि 2018 मध्ये पीएमएल-एनच्या पराभवापर्यंत त्यांनी पूर्ण कार्यकाळ सांभाळला. 2018 च्या निवडणुकीनंतर त्यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्याकडे कठोर प्रशासक म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर असेही म्हटले जाते की, ते नेहमीच व्यस्त असतात. त्यांचे सैन्याशी असलेले संबंध भावाच्या तुलनेत बरेच चांगले मानले जातात. लष्कराने शरीफ यांना पदच्युत केले होते. शहबाज शरीफ यांनी बरीच मालमत्ता जमवली आहे. त्याचबरोबर सामान्य पाकिस्तानी नागरिकांमध्ये ते बरेच लोकप्रिय आहेत. डिसेंबर 2019 मध्ये, नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने मनी लाँड्रिंगचा आरोप करत शाहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांच्या 23 मालमत्ता गोठवल्या. याच प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती. एप्रिल 2021 मध्ये लाहोर हायकोर्टाने त्याला मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनावर सोडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT