Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

इशारा! इम्रान खान यांना अटक झाल्यास पाकिस्तानची श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल

दैनिक गोमन्तक

माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक झाल्यास येथे श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांनी पाकिस्तानला दिला आहे. रविवारी फैसलाबाद येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शेख रशीद म्हणाले की, सध्याचे आघाडी सरकार दिशाहीन असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरत आहे. (If Imran Khan is arrested Pakistan will be in the same situation as Sri Lanka)

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) इम्रान खानला अटक झाल्यास परिस्थितीला तोंड देण्याची रणनीती आम्ही तयार केली आहे. ते म्हणाले की, 'इमरान खानला अटक झाल्यास पाकिस्तानमध्ये श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याला सध्याचे सरकार जबाबदार असेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

माजी मंत्री म्हणाले की, एका महिन्यात देशाचे 6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. ते म्हणाले की, 'शेहबाज शरीफ, तुम्ही देशाला संबोधित करा आणि सांगा की तुम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) जाणार आहे की नाही'. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी इम्रान खान यांच्यावर देशात गृहयुद्धाची रणनीती तयार केल्याचा आरोप केला. यासाठी इम्रानयांच्यावर कारवाईचा इशाराही शाहबाज यांनी दिला आहे.

रशीदने पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट (पीडीएम) वरही खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, पक्षांच्या युतीने अविश्वास प्रस्तावाद्वारे पीटीआयच्या नेतृत्वाखालील सरकार यशस्वीपणे पाडले आहे. मात्र, इम्रान खान यांना हटवल्यानंतरही ते देशाचे हिरो ठरले आहेत.

1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करताना दिसून येत आहे. याबाबत श्रीलंकेतही निदर्शने होताना दिसून येत आहे. राजपक्षे कुटुंबीय आणि भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचे नुकसान झाल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT