Hamas killing its own people, IDF shares shocking video. Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: आपल्याच लोकांचे जीव घेतोय हमास, IDFने शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

Mosab Hassan Yousef: व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, हमासच्या दहशतीखाली वाढलेल्या आणि जीव वाचवण्यासाठी पळून गेलेल्या हमास नेत्याचा मुलगा हमासबद्दलचे काळे सत्य सांगत आहे.

Ashutosh Masgaunde

IDF shared new video exposing Hamas terrorists. Mosab Hassan Yousef son of the Hamas leader makes a sensational claim:

इस्रायलच्या संरक्षण दलाने एक नवा व्हिडिओ शेअर करून हमासच्या दहशतवाद्यांचा पर्दाफाश केला आहे. या व्हिडिओमध्ये हमास नेत्याचा मुलगा खळबळजनक दावा करत आहे.

हमासच्या नेत्याच्या मुलाने सांगितले की, पॅलेस्टिनींच्या मृत्यूमागे इस्रायलचा हात नसून हमासचे दहशतवादी पॅलेस्टाईनच्या लोकांची हत्या करत आहेत. हमास केवळ पैशासाठी पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची हत्या करत आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सने हमासचे संस्थापक सदस्य हसन युसूफ यांचा मुलगा मोसाब हसन युसूफ याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, "हमासच्या दहशतीखाली वाढलेल्या आणि जीव वाचवण्यासाठी पळून गेलेल्या हमास नेत्याचा मुलगा हमासबद्दल संपूर्ण सत्य सांगत आहे."

व्हिडिओमध्ये दहशतवाद्याचा मुलगा म्हणतोय की, "हमास पुन्हा पुन्हा युद्ध सुरू करतो. जेव्हा जेव्हा हमासला पैशाची गरज असते तेव्हा ते लोकांचे रक्त सांडायला लागतात. हा त्यांचा गेम प्लॅन आहे आणि अशा प्रकारे ते त्यांची ताकद वाढवण्याचे काम करतात."

व्हिडिओमध्ये मोसाब युसूफने सांगितले की, "त्यांच्याकडून डागण्यात आलेले रॉकेटने चुकीचा वेध घेतला आणि ते रुग्णालयावर आदळले. त्यामुळे रुग्णालयात आश्रय घेतलेल्या शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे."

दहशतवाद्याच्या मुलाने हमासवर इतरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. तो पुढे म्हणाला की, लोकांच्या मृत्यूला इस्रायल जबाबदार नाही.

मोसाब म्हणाला की, "गुन्हेगारांनी केवळ पॅलेस्टिनी समाजावर अन्याय केला आहे आणि जगाच्या नजरेत त्यांना पीडित म्हणून चित्रित केले आहे. त्यांचा उद्देश पॅलेस्टाईनचे रक्षण करणे किंवा देश निर्माण करणे हे नाही, उलट ते पॅलेस्टाईनचा माध्यम म्हणून वापर करून आपला अजेंडा चालवतात."

काही दिवसांपूर्वी गाझा शहरातील अल अहली हॉस्पिटलवर हल्ला झाला होता, ज्यामध्ये 500 लोकांचा मृत्यू झाला होता.

या हल्ल्याबाबत इस्रायलने हा हल्ला हमासच्या दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा दावा केला होता. इस्रायलने दहशतवाद्यांच्या संभाषणाचे व्हिडिओ फुटेज आणि ऑडिओही शेअर केले होते.

गेल्या महिन्यात ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर ५००० रॉकेट डागले होते आणि सुमारे २५०० दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून लोकांची हत्या केली होती. तेव्हापासून इस्रायलकडून हमासवर सातत्याने हल्ले करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT