PTI leaders leaving Party Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan : माझ्याकडे दोन पर्याय आहेत, पक्ष सोडण्याचा किंवा आत्महत्येचा… इम्रान खान यांनी शेअर केला पीटीआय नेत्याचा मॅसेज

Pakistan Election : पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला खान यांनी सांगितले की, पीटीआय तीन गटांमध्ये विभागली जाईल. यामुळे पीएमएल-एनला त्याच्यापासून धोका नाही.

Ashutosh Masgaunde

पाकिस्तानच्या राजकारणात सध्या अनेक चढ उतार सुरूच आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, सरकार जबरदस्तीने त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सरकार पीटीआयच्या नेत्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना पक्ष सोडण्याची धमकी देत ​​आहे. घरातील महिलांच्या नावाने नेत्यांना धमकावले जात आहे.

इम्रान यांनी शेअर केलेल्या मॅसेज मध्ये काय ?

इम्रान खान यांनी आता पक्ष सोडलेल्या पीटीआय नेत्याच्या मॅसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मेसेजमध्ये नेत्याने इम्रान खान यांना पक्ष सोडण्याचे कारण सांगितले. त्यांनी उर्दूमध्ये पाठवलेला मॅसेज असा आहे,

… अध्यक्ष महोदय, पीटीआय सोडण्यासाठी माझ्यावर खूप दबाव होता. आता सहन होत नाही. माझ्या कुटुंबातील महिला आणि व्यवसायासाठी माझा छळ केला जात आहे. आता पक्ष सोडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, तुम्ही पहिल्यांदा मियांवलीतून निवडणूक लढवली तेव्हापासून मी तुमच्यासोबत होतो. आता माझ्याकडे दोनच पर्याय आहेत, एकतर पक्ष सोडावा लागेल किंवा आत्महत्या करावी लागेल.

“पीटीआयचे तीन तुकडे होतील”

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला खान यांनी सांगितले की, पीटीआय तीन तुकड्यांमध्ये विभागली जाईल. यामुळे पीएमएल-एनला त्याच्यापासून धोका होणार नाही.

जहांगीर तारीनच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी शांत राहावे, असे ते म्हणाले. आमची व्होट बँक कुठेही जाणार नाही. पंजाबमध्ये पीटीआय आणि पीएमएल-एन एकमेकांना आव्हान देत होते पण आता परिस्थिती बदलली आहे.

पीटीआय तीन गटात विभागले जाईल, एक गट पीपीपीकडे जाईल आणि दुसरा जहांगीर तरीनसोबत जाईल. तर काही नेते पीटीआयमध्येच राहतील.

खान यांनी यापूर्वीही पक्ष फोडल्याचा आरोप केला होता

पाकिस्तान सरकारच्या आदेशानुसार खान यांना ९ मे रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी जिना हाऊस, मियांवली एअरबेस, आयएसआय भवन यासह डझनभर लष्करी आस्थापनांची तोडफोड केली.

रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयावरही जमावाने हल्ला केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी, सुरक्षा दलाच्या गोळीबारात त्यांच्या पक्षाचे सुमारे 40 लोक मारले गेल्याचा दावा पीटीआयने केला आहे.

लष्कराच्या माध्यमातून पीटीआयला संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला होता. या सर्व कटामागे पीडीएमचा हात आहे, जे देशासाठी अत्यंत घातक आहे. पाकिस्तानचे सरकार आता आमच्याकडून निवडणुका जिंकू शकत नाही, म्हणून ते आता लष्कराच्या मदतीने आम्हाला तोडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT