Jizan

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

हुथी बंडखोरांनी पुन्हा एकदा सौदी अरेबियावर केला हल्ला, जिझानवर डागले क्षेपणास्त्र !

सौदी अरेबिया आणि हुथी बंडखोर यांच्यातील युद्ध सातत्याने वाढत आहे. येमेनच्या बंडखोरांनी शुक्रवारी रात्री उशिरा सौदी अरेबियाच्या दक्षिण सीमेवरील जिझान (Jizan) शहरावर हल्ला केला.

दैनिक गोमन्तक

सौदी अरेबिया आणि हुथी बंडखोर यांच्यातील युद्ध सातत्याने वाढत आहे. येमेनच्या बंडखोरांनी शुक्रवारी रात्री उशिरा सौदी अरेबियाच्या दक्षिण सीमेवरील जिझान (Jizan) शहरावर हल्ला केला. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. सौदी अरेबियाच्या सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे. येमेनच्या (Yemen) हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्र डागले, ज्यात सौदी अरेबिया आणि येमेनमधील प्रत्येकी एक व्यक्ती ठार झाली, अधिकृत सौदी प्रेस एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार सांगण्यात आले.

दरम्यान, जखमींपैकी सहा सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) असून एक बांगलादेशी नागरिक आहे. या हल्ल्यात जवळपासच्या गाड्या आणि दुकानांचेही नुकसान झाले आहे. येमेनच्या दीर्घकाळ चाललेल्या गृहयुद्धातील शिया हुथी बंडखोरांनी केलेला हा ताजा सीमापार हल्ला आहे. यापूर्वी, हौथींनी सौदी अरेबियाच्या तेल केंद्रांवर आणि इतर शहरांवर अनेकदा हल्ले केले आहेत. याआधी सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सैन्याने येमेनमधील बंडखोरांच्या ताब्यातील राजधानी असलेल्या सानावर अनेक हवाई हल्ले केले.

सना शहरावर हवाई हल्ले

शुक्रवारी सौदी अरेबियाने सना शहरावर हवाई हल्ले केले. आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या एका छावणीला लक्ष्य केले. हौथी आणि सौदी अरेबिया (Saudi Arabia in Yemen) च्या मीडियाने ही माहिती दिली. येमेनमधील युद्ध 2014 मध्ये सुरु झाले, जेव्हा इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी सना आणि देशाच्या बहुतेक उत्तरेकडील भागावर कब्जा केला. येमेनच्या गृहयुद्धात सुमारे 130,000 लोक मारले गेले. यातून जगातील सर्वात वाईट मानवतावादी आपत्ती निर्माण झाली.

इराण करतोय मदत

इराण (Iran) या हुथी बंडखोरांना मदत करत असल्याचा आरोप होत आहे. अमेरिकेच्या नौदलाने दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, त्यांनी मासेमारीच्या जहाजावर साठवलेल्या शस्त्रास्त्रांची मोठी खेप जप्त केली असून जी इराण कथितपणे युद्धग्रस्त येमेनमध्ये पाठवत आहे. यूएस नौदलाच्या गस्ती जहाजांनी ओमान आणि पाकिस्तानपासून (Pakistan) दूर अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागात सोमवारी सुरु केलेल्या कारवाईदरम्यान एक मासेमारी जहाज (Iran arms smuggling) पकडले. खलाशी या जहाजावर गेले आणि तेथे त्यांना 1,400 कलाश्निकोव्ह प्रकारच्या रायफल आणि 2,26,600 शस्त्रास्त्रे आणि पाच क्रू मेंबर्स सापडले, जे येमेनचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT