Hungary Elizabeth Bathory Dainik Gomantak
ग्लोबल

Hungary Elizabeth Bathory: रक्ताने आंघोळ करण्यासाठी 600 मुलींचा जीव घेणारी हंगेरीची 'एलिझाबेथ'

एलिझाबेथ बॅथोरी ही इतिहासातील सर्वात खतरनाक आणि क्रूर महिला सिरीयल किलर म्हणून ओळखली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

जगात अनेक निर्दयी आणि क्रूर लोक झाले आहेत, जे हजारो लोकांच्या मृत्यूला जबाबदार आहेत. या लोकांनी स्वतःच्या हातांनी अनेकांची हत्या केली होती. इतिहासाच्या पानांवर अशा वेडे राजे आणि सम्राटांचा उल्लेख आढळतो, ज्यांन लोकांना मारण्यात आनंद वाटत असे. याबाबत केवळ पुरूषच नाही तर, एक दुष्ट स्त्री देखील आहे जी तिच्या क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध होती

(Hungary female serial killer Elizabeth Bathory)

एलिझाबेथ बॅथोरी ही इतिहासातील सर्वात खतरनाक आणि क्रूर महिला सिरीयल किलर म्हणून ओळखली जाते. या महिलेला जिवंत ड्रॅकुला म्हटले जात असे. बॅथरीला मुलींच्या रक्तात आंघोळ करण्याची भयंकर इच्छा होती.

जगातील या सर्वात क्रूर महिलेचे नाव आहे एलिझाबेथ बॅथोरी असे असून, ती हंगेरीमध्ये राहत होती. बॅथोरीचा जन्म हंगेरीच्या बॅथोरी कुटुंबात झाला. तिचे लग्न फेरेंक नाडेस्डीशी झाले होते, जो तुर्कांविरुद्धच्या युद्धात हंगेरियन राष्ट्रीय नायक होता.

एलिझाबेथ बॅथोरीने तिचे तारुण्य टिकवण्यासाठी 1585 ते 1610 या काळात तिच्या राजवाड्यात 600 हून अधिक मुलींची हत्या केली. ज्या मुलींच्या रक्ताने ती आंघोळ करायची, त्यांना मारण्यापूर्वी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्या मुलींना बेदम मारहाण करण्यात आली, त्यांचे हात कापले गेले.

शेवटी, त्याला मेल्यानंतर, त्यांचे सर्व रक्त एका टबमध्ये गोळा केले जाई. ज्यामध्ये एलिझाबेथ बॅथोरी आंघोळ करत असे. अनेकवेळा ती मुलींच्या चेहऱ्याचे किंवा शरीराच्या इतर भागाचे मांस दाताने चावत असे.

बॅथोरीने 25 वर्षे भयानक दहशत पसरवली, त्यानंतर हंगेरीच्या राजाने तिला अटक केली आणि 21 ऑगस्ट 1614 रोजी बंदिवासात तिचा मृत्यू झाला. बॅथोरी यांच्या जीवनावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत आणि काही चित्रपटही बनले आहेत. वृत्तानुसार, कादंबरीकार ब्रॅम स्टोकर यांनी 1897 मध्ये त्यांची प्रसिद्ध कादंबरी ड्रॅक्युला तयार केली, जी बॅथरीच्या थीमपासून प्रेरित होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्नाचे वचन दिले, घरात बोलणी सुरु झाली पण 'तो' शरीराची भूक भागवून पसार झाला; गोव्यात सरकारी अधिकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Mormugao: मुरगावात ४० इमारती धोकादायक! पालिका इमारतींचाही समावेश; ठोस कृती करण्याची गरज

Mhaje Ghar: 'भाजप सरकार कोणाचेच घर मोडणार नाही'! मुख्यमंत्र्यांची ग्वाही; सर्व घरे कायदेशीर करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा

Goa Today's News Live: जबडा तुटला, पाळीव कुत्र्याच्या तोंडावर झाडली गोळी, गुन्हा दाखल

Chapora River: शापोरा नदी घेणार ‘मोकळा’ श्‍‍वास! सव्वालाख घनमीटर गाळ निघणार; सात ते आठ कोटींचा येणार खर्च

SCROLL FOR NEXT