PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: युद्धानंतर कसं असलं गाझाचं रुपडं, नेतन्याहू यांनी मांडला प्लॅन; जाणून घ्या काय आहे खास?

Israel PM Benjamin Netanyahu: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्रायली लष्कर गाझामध्ये जोरदार हल्ले करत आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्रायली लष्कर गाझामध्ये जोरदार हल्ले करत आहे. युएनमध्ये हे युद्ध थांबवण्यासाठी प्रस्तावही मांडण्यात आला होता, पण अमेरिकेने त्याला व्हेटो केला. यामुळे मुस्लिम देश संतप्त झाले. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धानंतर गाझाचे स्वरुप काय असेल यासंदर्भात आपली योजना मांडली आहे.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमाससोबतच्या युद्धाच्या समाप्तीनंतरच्या परिस्थितीसाठी एक धोरण तयार केले आहे, ज्या अंतर्गत इस्रायलचे लष्कराविना गाझावर नियंत्रण असेल आणि सामान्य जीवनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. नेतन्याहू यांची ही योजना त्यांच्या मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.

या योजनेबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही

दरम्यान, नेतन्याहू यांनी प्रथमच औपचारिकपणे युद्धानंतरच्या परिस्थितीसाठी एक योजना सादर केली आहे, मात्र त्याबाबतची फारशी माहिती देण्यात आलेली नाही. गाझामधील इस्रायलच्या भूमिकेवर नेतन्याहू यांचा भर पॅलेस्टाईनमध्ये स्वायत्त सरकार निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावांशी विसंगत आहे.

इस्त्रायलच्या नियंत्रणात असेल गाझा

अमेरिकेच्या प्रस्तावांनुसार, युद्धानंतर गाझा आणि इस्रायली-व्याप्त वेस्ट बँक या दोन्हींवर राज्य करेल असे सरकार स्थापन केले पाहिजे. पंतप्रधान कार्यालयाने प्रकाशित केलेला आराखडा गुरुवारी रात्री उशिरा मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला. 2007 मध्ये गाझाचा ताबा घेतलेल्या हमास या दहशतवादी गटाचा खात्मा करण्यासाठी इस्रायल कटिबद्ध असल्याचे या योजनेत नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT