Mexico Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Mexico Viral Video: हवेत उडणाऱ्या हॉट एअर बलूनला लागली आग, पर्यटकांनी आकाशातून ठोकली उडी

अपघातात 39 वर्षीय महिला आणि 50 वर्षीय पुरुष मृत झाला असून, एक बालकही भाजले आहे.

Pramod Yadav

Mexico Viral Video: मेक्सिकोतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक हॉट एअर फुगा हवेत उडत असून त्याला अचानक आग लागली. दरम्यान, काही लोक जीव वाचवण्यासाठी फुग्यावरून खाली उडी मारताना दिसत आहेत. शनिवारी, 1 एप्रिल रोजी मेक्सिको सिटीजवळील प्रसिद्ध टिओतिहुआकान पुरातत्व स्थळाजवळ ही घटना घडली असे सरकारने सांगितले आहे. या अपघातात आगीमुळे दोघांचा मृत्यू झाला.

मेक्सिको राज्य सरकारने सांगितले की काही प्रवाशांनी बलूनमधून उडी मारली. या अपघातात एक बालकही भाजले आहे. अपघातात 39 वर्षीय महिला आणि 50 वर्षीय पुरुष मृत झाला आहे. या अपघातात एका मुलाचा चेहरा आगीत पूर्णपणे जळाला आहे. यासोबतच त्याचा उजवा पायही फ्रॅक्चर झाला आहे. आग लागल्यानंतर बलूनमधील अनेक प्रवासी घाबरले आणि त्यांनी हॉट एअर बलूनमधून उड्या मारल्या

दरम्यान, जारी करण्यात आलेल्या निवेदनात हॉट एअर बलूनमध्ये इतर प्रवासी होते की नाही हे सांगण्यात आलेले नाही. त्याचवेळी या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये, निरभ्र आकाशात हॉट एअर बलूनने उड्डाण करताच फुग्याच्या गोंडोलाला आग लागली. त्यात बसलेले प्रवासी घाबरले आणि त्यांनी हॉट एअर बलूनवरून उड्या मारल्या. असे दिसून येत आहे.

मेक्सिकोतील टिओतिहुआकन हे सूर्य आणि चंद्राचे पिरॅमिड्स आणि त्याचा अव्हेन्यू ऑफ डेड असलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे प्री-कोलंबियन काळातील स्मारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: मुंबई-चेन्नई तळाला! पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा दबदबा, आरसीबी बॅकफूटवर; पंजाब किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण

GCA Premier League: वेगवान शुभम तारीचे पर्वरीत 'तुफान', डावात सहा गडी टिपले; 'चौगुले'समोर 'एमसीसी'चे नमते

Valpoi: वाळपईत हॉटेलामध्ये खाद्यपदार्थांवर कात्री, गॅस सिलिंडरचा तुटवडा; सामोसा, कांदा भजी मिळते एकाच वेळी

8th Pay Commission: कधी लागू होणार 8वा वेतन आयोग? फिटमेंट फॅक्टर आणि नवीन पगाराचं संपूर्ण गणित; कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट

Summer Special Train: गोवामार्गे तिरुवनंतपुरम-मदार विशेष रेल्वेसेवेला मुदतवाढ, उन्हाळी सुटीसाठी प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT