Hindu Temple In America Dainik Gomantak
ग्लोबल

Hindu Temple: अमेरिकेत खलिस्तानवाद्यांनी पुन्हा हिंदू मंदिराला केले लक्ष्य; 14 दिवसांत दुसरी घटना

Hindu Temple: खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेतील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले आहे. यावेळी कॅलिफोर्नियातील हेवर्ड येथील शेरावली मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे.

Manish Jadhav

Hindu Temple: खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेतील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले आहे. यावेळी कॅलिफोर्नियातील हेवर्ड येथील शेरावली मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिकेत 14 दिवसांत खलिस्तानवाद्यांनी हिंदू मंदिरावर हल्ला केल्याची ही दुसरी घटना आहे. खलिस्तान झिंदाबादच्या घोषणांसोबतच खलिस्तानवाद्यांनी मंदिराच्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्दही लिहिले आहेत. अमेरिकेतील हिंदूंसाठी काम करणाऱ्या हिंदू अमेरिकन फाऊंडेशन या संस्थेने या हल्ल्याची माहिती दिली आहे.

हल्ल्याची धमकी देण्यात आली

आठवडाभरापूर्वी या भागातील शिव दुर्गा मंदिरावर हल्ल्याची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर आता शेरावली मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. एचएएफने म्हटले आहे की, ते अमेरिकन सुरक्षा कर्मचारी, नागरी हक्क कार्यकर्ते तसेच मंदिरांचे नेतृत्व करणाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

कॅलिफोर्नियामध्ये यापूर्वीही घडलेली घटना

याआधी 22 डिसेंबर रोजी खलिस्तानवाद्यांनी अमेरिकेतील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले होते. त्यानंतर खलिस्तानींनी कॅलिफोर्नियातील नेवार्कमध्ये ही घटना घडवून आणली. अमेरिकेच्या हिंदू-अमेरिकन फाऊंडेशनने या घटनेचे फोटो शेअर करताना सोशल मीडियावर लिहिले होते की, खलिस्तानवाद्यांनी नेवार्क, कॅलिफोर्निया येथील स्वामीनारायण मंदिर वसना संस्थेला लक्ष्य केले.

नेवार्कमधील भिंतींवर घोषणा लिहिल्या होत्या

खलिस्तानींनी मंदिराच्या भिंतींवर खलिस्तानी घोषणा लिहिल्याचं संघटनेनं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं. ही माहिती नेवार्क पोलिसांना तसेच नागरी हक्क अधिकार्‍यांना देण्यात आली. हिंदू-अमेरिकन फाऊंडेशनने म्हटले होते की, पोलिसांनी या घटनेचा द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास करावा, असा आग्रह धरत आहे.

कॅनडामध्ये एका मंदिराची तोडफोड करण्यात आली

अमेरिका आणि कॅनडामध्ये अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. अलीकडेच, कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांनी मध्यरात्री सरे शहरातील एका मंदिराची तोडफोड केली आणि मंदिराच्या मुख्य दरवाजावर खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूबद्दल सार्वमताचे पोस्टर्स लावले होते.

खलिस्तान सार्वमतासाठी पोस्टर लावण्यात आले

आरोपींची ही कृती मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाली असून, त्यात दोन व्यक्ती मंदिरात आल्याचे दिसत आहे. दोघांनीही तोंड लपवले होते. निळ्या रंगाचा फेटा घातलेल्या व्यक्तीने मंदिराच्या मुख्य दरवाजावर खलिस्तानी सार्वमताचे पोस्टर लावले होते. यानंतर दोघेही तेथून पळून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT