Hezbollah Attack On Israel Dainik Gomantak
ग्लोबल

Hezbollah Attack On Israel: हिजबुल्लाचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, काही मिनिटांत डागली 37 रॉकेट; ''निष्पाप पॅलेस्टिनींच्या मृत्यूचा हा बदला...''

Hezbollah Attack On Israel: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, हमासने इस्रायलच्या भूमीवर 7 ऑक्टोबर रोजी मोठा हल्ला केला.

Manish Jadhav

Hezbollah Attack On Israel: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, हमासने इस्रायलच्या भूमीवर 7 ऑक्टोबर रोजी मोठा हल्ला केला. याचदरम्यान, लेबनॉनस्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाने उत्तर इस्रायलच्या माउंट मेरॉन भागात रात्रभर रॉकेट हल्ले केले.

हिजबुल्लाने रॉकेट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हिजबुल्लाने काही मिनिटांतच 37 रॉकेट डागली. या हल्ल्यात इस्रायलच्या बाजूने सर्वात मोठे अपयश म्हणजे त्यांची क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण प्रणाली आयर्न डोम, जी 37 पैकी फक्त 7 रॉकेटना जमिनीवर पोहोचण्यापासून रोखू शकली.

या हल्ल्याबाबत हिजबुल्लाने सांगितले की, ते हमासच्यावतीने बदला घेत आहेत.' निष्पाप पॅलेस्टिनींच्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याबद्दल हिजबुल्लाने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, हिजबुल्लाने (Hezbollah) इस्रायलच्या भूमीवर केलेल्या हवाई हल्ल्यांचे वर्णन आपल्या नागरिकांच्या मृत्यूचा बदला म्हणून केले आहे. गाझामध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून हिजबुल्ला आणि इस्रायल जवळजवळ दररोज सीमापार हल्ले करत आहेत.

लेबनॉनमध्ये काल रात्री इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी गटाच्या तीन सदस्यांसह पाच जण ठार झाले. जाफर मरजी, अली मरजी आणि हसन मरजी या हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तर म्हणून, हिजबुल्लाने रविवारी काही मिनिटांत उत्तर इस्रायलवर तब्बल 37 रॉकेट डागली.

आयडीएफच्या म्हणण्यानुसार, काही वेळापूर्वी लेबनॉनमधून (Lebanon) माउंट मेरॉन परिसरात सलग दोनदा 37 रॉकेट डागण्यात आली. आयडीएफचे म्हणणे आहे की, पहिल्या व्हॉलीमध्ये 30 रॉकेट डागण्यात आली. यापैकी एक रॉकेट आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टमने रोखले होते.

दुसऱ्या साल्वोमध्ये सात रॉकेट डागण्यात आली, त्यापैकी सहा यशस्वीरित्या पाडण्यात आली. आयडीएफने हल्ल्याच्या भागातून कोणत्याही जखमी किंवा मृत्यूची पुष्टी केलेली नाही. हिजबुल्लाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी मेरॉन शहरावर डझनभर रॉकेट डागल्याचे सांगितले.

लाखो पॅलेस्टिनी उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत

गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या भीषण युद्धादरम्यान परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. त्याचा सर्वाधिक त्रास तेथील सर्वसामान्यांना होत आहे. लाखो पॅलेस्टिनी उपासमारीच्या वाटेवर आहेत. लोक प्रत्येक छोट्या गोष्टीवर अवलंबून आहेत.

दरम्यान, जॉर्डनकडून निश्चितपणे हवाई मदत देण्यात आली आहे. मात्र ही मदतही अपुरी आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर सर्व काही बदलले.

आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. लोक जीव वाचवण्यासाठी शेजारील देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. इथे लहान मुले, वृद्ध, महिला दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT