वादळादरम्यान पाऊस पडू लागला, परंतु हा पाऊस (Rain) फक्त एका गाडीवरच पडला. Dainik Gomantak
ग्लोबल

इंडोनेशियातील धक्कादायक घटना, पार्किंगमधील फक्त एकाच गाडीवर पडला जोरदार पाऊस

दुर्मिळ हवामानाच्या घटनेला "अल्ट्रा लोकलाइज्ड पाऊस" (ultra localized rain) असे म्हणतात. याविषयी बोलताना तेथील स्थानिक रहिवाशी म्हणाला, सुरुवातीला मला वाटले की कोणीतरी हॉटेलमधून पाणी टाकत आहे. पण जेव्हा मी वर पाहीले तेव्हा खरोखरच आकाशातून पाऊस (Rain) कोसळत होता.

दैनिक गोमन्तक

इंडोनेशियन शहरातील (Indonesian city) बेकासी (Bekasi) येथील रहिवाशाने एका दुर्मिळ हवामान (Weather) घटनेचे चित्रीकरण केले आहे. जेथे वादळादरम्यान पाऊस पडू लागला, परंतु हा पाऊस फक्त एका गाडीवरच पडला.

दुर्मिळ हवामानाच्या घटनेला "अल्ट्रा लोकलाइज्ड पाऊस" असे म्हणतात. याविषयी बोलताना तो म्हणाला, सुरुवातीला मला वाटले की कोणीतरी हॉटेलच्यावर पाण्याशी खेळत आहे. पण जेव्हा मी वर पाहीले तेव्हा खरोखरच आकाशातून पाऊस कोसळत होता. बेकासी रीजन्सीचे सदस्य असलेले उरयन, हे या भिजलेल्या काळ्या कारजवळ गेले, पण त्यांना कोणी त्यावर मुद्दाम पाणी फवारताना दिसले नसल्याचे त्यांनी सांगितले.

इंडोनेशियात 2017 मध्येही अशीच एक घटना घडली होती, जिथे दक्षिण जकार्तामधील एकाच घरावर पाऊस पडला होता. 2016 मध्ये इटलीतील पालेर्मो येथेही अल्ट्रा लोकलाइज्ड पावसाची नोंद झाली आहे. त्या वेळी रस्त्याच्या कडेला झालेल्या पावसाने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना धक्का बसला. इंडोनेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देश जसे की मलेशिया, फिलीपिन्स आणि थायलंड हे उष्णकटिबंधीय मान्सून पावसाळी हंगामाच्या शिखरावर आहेत. जेथे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत पाऊस पडतो. 35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणारे तापमान अनेकदा मेघगर्जना, विजांचा कडकडाट, पाऊस आणि अचानक पूर यांसह शक्तिशाली उष्णकटिबंधीय वादळे येथे येतात. ज्यामुळे नद्या दुथडी भरुन वाहतात आणि धोकादायक बनतात. मेट ऑफिसच्या हवामानशास्त्रज्ञांनी अशा प्रकारच्या दुर्मिळ घटना या होतच असतात. असे म्हणले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT