Unprecedented Heat In Iran: इराणमध्ये उष्णतेने कहर केला आहे. उष्णतेमुळे इराण सरकारने मंगळवारी (1 ऑगस्ट) सर्व शाळा, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे आदेश देत दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
इराणी माध्यमांनुसार, अधिकाऱ्यांनी वृद्ध आणि आरोग्य समस्या असलेल्या लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, देशभरात बुधवार आणि गुरुवार सार्वजनिक सुटी जाहीर करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने सहमती दर्शविली," असे सरकारी प्रवक्ते अली बहादूर जहरोमी यांनी स्टेट वृत्तसंस्था IRNA ने सांगितले.
सिस्तान-बलुचिस्तानच्या आग्नेय प्रांतात, वाढत्या तापमानामुळे आणि धुळीच्या वादळांमुळे अलीकडच्या काही दिवसांत सुमारे 1,000 लोकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उष्माघाताचा धोका वाढू लागला आहे. विशेषतः कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत घरातच रहावे. शटडाऊनपूर्वी जूनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये बदल करण्यात आला होता. कार्यालयातील वीज वाचवण्यासाठी कर्मचारी (Employees) आता लवकर काम सुरु करतात.
दुसरीकडे, सरकारला (Government) शटडाऊनचे आदेश देण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी, शेजारच्या इराकने तापमान 125-अंश ओलांडल्यानंतर सार्वजनिक सुट्टी वाढवली.
तसेच, तापमानातील वाढ ही गेल्या महिन्यात आलेल्या नोंदीनुसार आहे. शास्त्रज्ञांनी जुलै हा आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका खंडांसह आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना म्हणून घोषित केला आहे. तज्ज्ञांच्या मते, मानव-प्रेरित हवामान बदलामुळे जागतिक तापमानवाढीच्या प्रभावात लक्षणीय वाढ झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.