Harvey Weinstein Dainik Gomantak
ग्लोबल

Harvey Weinstein: ऑस्कर विजेत्या चित्रपटाचे निर्माते बलात्काराच्या गुन्हात दोषी, सोळा वर्षांची कोठडी

बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या तीन गुन्ह्यांमध्ये हार्वेला दोषी ठरवले आहे.

Pramod Yadav

अमेरिकन चित्रपट निर्माता हार्वे वाइनस्टीन यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे आरोप झाले होते. नुकत्याच झालेल्या सुनावणीत निर्मात्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. लॉस एंजेलिसमधील खटल्याच्या सुमारे दोन महिन्यांनंतर हार्वे वेनस्टीनला गुरुवारी सकाळी 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या तीन गुन्ह्यांमध्ये हार्वेला दोषी ठरवले आहे.

(Harvey Weinstein gets 16 years in prison for rape, sexual assault in Los Angeles trial)

बेव्हरली हिल्स हॉटेलच्या खोलीत एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी हार्वे वाइनस्टीनला गुरुवारी 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी वाइनस्टीनला लैंगिक गुन्ह्याच्या आणखी एका प्रकरणात 23 वर्षांची शिक्षा झाली होती. लॉस एंजेलिस न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार न्यूयॉर्कमधील दुसर्‍या लैंगिक गुन्ह्यांसाठी 23 वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर आता तो नव्या शिक्षेत दोषी ठरला आहे.

दरम्यान, 70 वर्षीय हार्वे व्हीलचेअरवर बसून कोर्टात आले होते. त्यांनी न्यायाधीशांकडे दयेची याचना केली. "कृपया मला शिक्षा देऊ नका. या प्रकरणात बर्‍याच गोष्टी चुकीच्या आहेत." परंतु न्यायाधीश लिसा लीच यांनी त्याचे काहीही ऐकले नाही आणि त्याला 16 वर्षांची शिक्षा सुनावली.

एका अभिनेत्रीने इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, "हार्वेच्या स्वार्थी, घृणास्पद कृतींमुळे माझ्या आयुष्यावर खूप परिणाम झाला आहे. नुकसान भरून काढण्यासाठी एक शिक्षा पुरेशी नाही. वाइनस्टीनने वर्षानुवर्षे महिलांवर अत्याचार केले. आणि त्यांचा गैरवापर केला. इंडस्ट्रीमध्ये त्याचे शक्तिशाली स्थान आहे यामुळे महिलांनी त्याच्यावर जाहीर आरोप केले नाहीत."

#MeToo चळवळीमुळे अनेक महिला पुढे आल्या आहेत आणि वाइनस्टीनने त्यांच्याशी काय केले याबद्दल उघडपणे बोलल्या आहेत. हार्वे हॉलिवूड मधील सर्वात शक्तिशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक होता. त्यांच्या निर्मितीत बनलेल्या अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. हार्वेच्या आवाक्यामुळे महिला कधीही त्याच्या विरोधात उघडपणे बोलत नाहीत. त्याने अनेक महिलांना आपले बळी बनवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT