Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: गाझामधील इस्रायलच्या कारवाईवर भडकला हमास; ''युद्धविरामाच्या चर्चेला ब्रेक लावण्याचा हा प्रयत्न...''

Israel-Hamas War: गाझा येथील अल-शिफा रुग्णालय पुन्हा एकदा इस्रायलच्या हल्ल्याने हादरले आहे. यानंतर पुन्हा एकदा युद्धविरामाची चर्चा फोल ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War:

गाझा येथील अल-शिफा रुग्णालय पुन्हा एकदा इस्रायलच्या हल्ल्याने हादरले आहे. यानंतर पुन्हा एकदा युद्धविरामाची चर्चा फोल ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, ते गाझामधील वैद्यकीय सुविधेवर "सटीक ऑपरेशन" करत आहेत. इस्रायली लष्कराच्या या हल्ल्यानंतर हमासचा प्रमुख इस्माईल हनीयाह याने इशारा दिला की, इस्रायल युद्धविरामासाठीच्या चर्चेला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

तो पुढे म्हणाला की, 'पॅलेस्टिनी लोकांच्या मागण्या कायम ठेवल्याशिवाय आम्ही कोणताही युद्धविराम करार करणार नाही.' गाझा आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की ''अल-शिफा कंपाऊंडमध्ये विस्थापित नागरिक, जखमी रुग्ण आणि रुग्णालयातील (Hospital) कर्मचाऱ्यांसह सुमारे 30,000 लोक अडकले आहेत. इस्रायली सैन्याने दावा केला आहे की, हमासचे दहशतवादी अल-शिफा रुग्णालयामध्ये पुन्हा एकत्र आले आहेत आणि इस्रायलवर हल्ल्यांसाठी कमांड देण्यासाठी रुग्णालयाचा परिसर वापरत आहेत.''

या हल्ल्यामागे इस्रायलचा हेतू

इस्रायलच्या (Israel) कारवाईवर प्रतिक्रिया देताना हनीयाह म्हणाला की, ''इस्रायलचे हे पाऊल हे दाखवते की ते गाझामधील लोकांचे जीवन पूर्वपदावर येऊ देऊ इच्छित नाहीत. हा हल्ला जायनिस्टांचा गाझावासीयांच्या मूलभूत गरजा नष्ट करण्याचा इरादा दर्शवतो.'' तो पुढे म्हणाला की, ''गाझामधील पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना जाणूनबुजून लक्ष्य करणे हे आपल्या लोकांमध्ये अराजकता पसरवण्याचा आणि हिंसाचार कायम ठेवण्याचा इस्रायलचा हेतू दर्शवतो.''

कतारमध्ये शांतता चर्चा सुरु आहे

दुसरीकडे, रमजान महिन्यापूर्वी झालेल्या शांतता चर्चेचा कोणताही परिणाम झाला नाही. अमेरिका, कतार आणि इजिप्तने प्रयत्न करुनही हमास आणि इस्रायल यांच्यात एकमत झाले नाही. पुन्हा एकदा इस्रायली शिष्टमंडळ सोमवारी युद्धविराम आणि ओलीसांच्या सुटकेसाठी कतारला पोहोचले. इस्रायलने अल-शिफावर केलेल्या हल्ल्याचा या चर्चेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, कारण गाझातील लोकांच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करुन कोणताही करार करणार नाही, असे हमास सुरुवातीपासून सांगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT