Hajj Yatra 2022 News
Hajj Yatra 2022 News Dainik Gomantak
ग्लोबल

Hajj Yatra: सौदी अरेबियाची हिंदीवर नाराजी का? भारतीय मुस्लिम या सुविधेपासून वंचित

दैनिक गोमन्तक

Hajj Pilgrimage: दरवर्षी लाखो मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी सौदी अरेबियात जातात. भारतातूनही लाखो लोक दरवर्षी हज यात्रेसाठी सौदी अरेबियात जातात. जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने हज यात्रेवर दोन वर्षांपासून परिणाम झाला होता. मात्र कोरोनाचं संकट टळल्यानंतर आता हज यात्रेसाठी लाखो लोक पुन्हा जाऊ लागले आहेत. या वर्षीही लाखो भारतीय मुस्लिमांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली आहे. (Hajj Yatra 2022 News)

हज गाइड हिंदीत नाही

या वर्षी सौदी अरेबियाने (Saudi Arabia) यात्रेकरुंच्या मदतीसाठी खास गाइड तयार केले आहे. या गाइडच्या मदतीने यात्रेकरुंना आवश्यक ती सर्व माहिती मिळू शकते. 14 भाषांमध्ये हे गाइड जारी करण्यात आले आहे. परंतु हे गाइड हिंदीत प्रसिद्ध झाले नाही. तर दुसरीकडे, दरवर्षी लाखो भारतीय मुस्लिम (Muslim) हज यात्रेसाठी सौदी अरेबियात जातात. सौदी अरेबियाने यात्रेकरुंसाठी एक अनोखा जागृती उपक्रम म्हणून हे गाइड सुरु केले आहे.

हज यात्रेकरुंना मदत होईल

हज आणि उमराह मंत्रालयाने सुरु केलेल्या या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी जनजागृती करण्यात येणार आहे. या गाइडमध्ये यात्रेशी संबंधित विविध टप्पे आणि यात्रेकरुंशी संबंधित समस्यांचा समावेश आहे. या गाइडमध्ये यात्रेकरुंना यात्रेकरुंना आवश्यक ती सर्व धार्मिक, वैद्यकीय, प्रक्रियात्मक आणि तार्किक माहिती प्रदान करणारी भाषांतरे आहेत. या उपक्रमाद्वारे, हज आणि उमराह मंत्रालयाने हज यात्रेकरुंना शक्य तितक्या उत्तम सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

या भाषांमध्ये जारी केले गाइड

ई-गाइड अरबी, इंग्रजी, फ्रेंच, उर्दू, बंगाली, इंडोनेशियन, मलय, हौसा, अम्हारिक, पर्शियन, स्पॅनिश, तुर्की, रशियन आणि सिंहली भाषांमध्ये जारी करण्यात आले आहे. हे हज आणि उमराह यात्रेकरुंना प्रवासाच्या प्रत्येक पैलूंबद्दल आवश्यक ती मूलभूत माहिती थेट, सर्वसमावेशक पद्धतीने देते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT