Martin Moise Dainik Gomantak
ग्लोबल

मोठा खुलासा! पत्नीनेच केली राष्ट्राध्यक्ष पतीची हत्या; पंतप्रधानाच्या साथीने रचला होता कट

Haiti President Jovenel Moises Assassination: राष्ट्राध्यक्षाच्या पत्नी मार्टिन मोइज यांनी माजी पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांच्या साथीने राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट रचला होता.

Manish Jadhav

Haiti President Jovenel Moises Assassination:

हैतीच्या राष्ट्राध्यक्षाच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. आयबोपोस्टने सार्वजनिक केलेल्या न्यायाधीश वॉल्थर वेसर व्होल्टेअर यांच्या 122 पानांच्या दस्तऐवजात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्षाच्या पत्नी मार्टिन मोइज यांनी माजी पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांच्या साथीने राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट रचला होता. जेणेकरुन मार्टिन त्यांच्या जागी राष्ट्राध्यक्ष होऊ शकतील. 7 जुलै 2021 च्या रात्री, सशस्त्र लोकांनी त्यांच्या बेडरुममध्ये प्रवेश केला आणि राष्ट्राध्यांक्षाची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात मार्टिन मोइज देखील जखमी झाल्या होत्या.

दरम्यान, न्यायाधीश वॉल्थर वेझर यांच्या आदेशात आरोपींना (Accused) अटक आणि खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. मार्टिन मोइज यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करताना याला अन्यायकारक अटक आणि राजकीय छळ म्हटले होते. तर माजी पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांनी मियामी हेराल्डला सांगितले की, राष्ट्राध्यंक्षाच्या हत्येचा फायदा त्यांचा उत्तराधिकारी पंतप्रधान एरियल हेन्री यांना झाला. आता ते आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी हैतीच्या कायद्यांचा फायदा घेत आहेत.

हेन्रीने आरोप फेटाळून लावले

हेन्री यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "न्यायाधीश त्यांच्या विवेकबुद्धीनुसार आदेश जारी करण्यास स्वतंत्र आहेत आणि त्यांच्यावर कोणताही दबाव नाही." हत्येच्या काही दिवस आधी जोसेफ यांच्या जागी हेन्र यांना पंतप्रधान बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे, हेन्री यांनी निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु देशातील भूकंप आणि सशस्त्र गुन्हेगारी टोळ्यांची वाढती ताकद यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, ज्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी परदेशी मदतीची मागणी केली होती.

राष्ट्राध्यक्षांना मारण्यासाठी कोलंबियाचे सैनिक आले होते!

मियामीमध्ये मोईज यांच्या हत्येचा एक वेगळा खटला चालवला जात आहे. ज्यामध्ये सहा आरोपींना मोईज यांचे अपहरण करण्यासाठी कोलंबियातून भाडोत्री सैनिक पाठवण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. वृत्तानुसार, अपहरणाच्या या प्लॅनिंगचे 11 तासांतच हत्येच्या कटात रुपांतर झाले. अमेरिकन आरोपांनुसार, षड्यंत्रकर्त्यांनी मोईज यांच्या जागी हैतीमधील एक अमेरिकन पाद्री ख्रिश्चन इमॅन्युएल सॅनॉनला आणण्याचा प्रयत्न केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT