Hafiz Saeed Dainik Gomantak
ग्लोबल

26/11 च्या हल्ल्यात हात असलेल्या दशहतवाद्याचा मुलगा झाला बेपत्ता

लष्कर-ए-तोयबाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तसेच भारत, अमेरिका, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलियाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे

दैनिक गोमन्तक

भारतावर झालेला 26/11चा दहशतवादी हल्ला आजही लक्षात आहे. या हल्ल्यात हाफिज सईद इन या दहशतवाद्याचा महत्वाचा सहभाग होता. आता तो पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्याचा मुलगा कमालुद्दीन सईद २६ सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याची माहीती समोर आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, काहीजणांनी कमालुद्दीनला जबरदस्तीने कारमधून घेऊन गेले आहेत. पाकिस्तानच्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी दावा केला आहे की, गुप्तचर संस्था आयएसआय देखील त्याचा शोध घेऊ शकली नाही.

मुलगा बेपत्ता झाल्यानंतर वडील हाफिज सईद मोठ्या काळजीत असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, तीन जण कमलुद्दीनला सोबत घेऊन गेले आहेत. जून 2021 मध्ये लाहोरमधील जोहर शहरात हाफिजच्या घराबाहेर स्फोट झाला होता ज्यात तीन लोक ठार झाले होते. मार्च 2023 मध्ये, पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने लाहोरमध्ये तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

हाफिज सईद पाकिस्तानी नागरिक असून सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहे . हाफिज हा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आहे. लष्कर-ए-तोयबाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तसेच भारत, अमेरिका, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलियाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हाफिज हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.

अमेरिकेने सईदवर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. जुलै 2019 पासून तो पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. सईद जमात-उद-दावा नावाने ओळखली जाणारी दुसरी दहशतवादी संघटना चालवतो.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीओकेमध्ये दहशतवादी अबू कासिमही मारला गेला होता. त्यामुळे पाकिस्तानमधील गुप्तचर संस्था आता दबावाखाली आल्याचे म्हटले जात आहे. 26/11 च्या हल्ल्यात मोठे नुकसान झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Accident: राज्यात रस्ते अपघातात वाढ, 2022 पासून आतापर्यंत 843 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

Pakistan: 'सात पाऊले चल, मग गोळी मार...', पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचा थरकाप, जोडप्याचा VIDEO व्हायरल!

Goa Assembly Live: अर्थसंकल्पीय भाषणात आमदार गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा!

3.50 लाख रुपये देऊन गोव्यात मिळवली पोस्टमनची नोकरी; 40 गोमंतकीयांना कमी करुन 50 महाराष्ट्रातील उमेदवारांची भरती - सरदेसाई

SCROLL FOR NEXT