Power Grid Dainik Gomantak
ग्लोबल

Bangladesh: बांगलादेशात पॉवर ग्रीड फेल, जवळपास संपूर्ण देश अंधारात

Bangladesh News: पॉवर ग्रीड निकामी झाल्याने जवळपास संपूर्ण बांगलादेश अंधारात आहे.

दैनिक गोमन्तक

Bangladesh News: पॉवर ग्रीड निकामी झाल्याने जवळपास संपूर्ण बांगलादेश अंधारात आहे. देशाच्या मोठ्या भागात वीज नाही. मंगळवारी या पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाला. सरकारी वीज कंपनीकडून सांगण्यात आले की, दुपारी 2 वाजता अचानक देशाच्या 80 टक्के भागातील वीज गेली. बांगलादेशच्या उत्तर-पश्चिम भागातील काही भाग वगळता उर्वरित देश अंधारात आहे. बांगलादेशच्या सरकारी वीज एजन्सीचे प्रवक्ते एहसान यांनी सांगितले की, पॉवर ग्रिड बिघडण्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्याची पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, बांगलादेशचे (Bangladesh) कनिष्ठ तंत्रज्ञान मंत्री जुनैद पलक यांनी फेसबुकवर सांगितले की, राजधानी ढाकामध्ये (Dhaka) रात्री 8 वाजेपर्यंत वीज परत येईल. ढाकामध्येच सुमारे 22 दशलक्ष लोक राहतात.

तसेच, बांगलादेश गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. रशियाने युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत.

दुसरीकडे, या दक्षिण आशियाई देशात ब्लॅकआऊटमुळे जनतेमध्ये रोष आहे. यापूर्वी, नोव्हेंबर 2014 मध्ये बांगलादेशला अचानक मोठ्या ब्लॅकआऊटचा सामना करावा लागला होता. त्यावेळी देशातील 70 टक्के भाग सुमारे 10 तास वीजेविना होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT