Green Comet Dainik Gomantak
ग्लोबल

Green Comet: अतंराळात 50 हजार वर्षांनंतर दिसले अदभूत दृष्यं; पृथ्वीच्या जवळून गेला हिरवा धुमकेतू

सुमारे 50 हजार वर्षांनंतर हे अदभूत दृष्यं पाहायला मिळालं आहे.

दैनिक गोमन्तक

Green Comet ztf Closest to Earth: अंतराळामध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत, असे म्हटले जाते. अंतराळामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या अजूनही लोकांच्या नजरेसमोर आलेल्या नाहीत. अंतराळात फार अनोख्या घटना पाहायला मिळतात.

अनेक शास्त्रज्ञांकडून अंतराळा संदर्भात संशोधन सुरु आहे. यातून नवनवीन माहिती समोर येत असते. नुकताच अंतराळामध्ये एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले आहे. 50 हजार वर्षांनंतर एक धुमकेतू पृथ्वीच्या जवळून गेला आहे. हा धुमकेतून याआधी 50 हजारपूर्वी पाषणयुगात पृथ्वीजवळून गेला होता असे माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

  • सुमारे 50 हजार वर्षांनंतर दिसलं अदभूत दृष्यं

50 हजार वर्षानंतर पृथ्वीच्या जवळून हिरव्या रंगाचा धूमकेतू गेला आहे. लडाखमधील हानले येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी हिरव्या धूमकेतूचे फोटो (Photo) टिपले आहेत.

यासाठी खास दुर्बिणीचा वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार नेमकी हीच घटना निएंडरथल मानवाच्या काळात घडली घडली होती, तेव्हा अंतराळ विज्ञान याबाबतची माहिती सुद्धा नव्हती.

  • 26 दशलक्ष मैल दूर होता हिरवा धूमकेतू

अंतराळ शास्त्रज्ञांनी या हिरव्या रंगाच्या धूमकेतूचा शोध मार्च 2022 मध्ये लागला. या धूमकेतूला C/2022 E3 (ZTF) असे नाव देण्यात आले आहे. कॅलिफोर्नियाच्या झ्विकी ट्रान्झियंट फॅसिलिटीच्या शास्त्रज्ञांनी मार्च 2022 मध्ये हा धूमकेतू शोधला आणि तेव्हापासून ते या धूमकेतूचा मागोवा घेत आहेत.

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या धूमकेतूला सूर्याभोवती (Sun) प्रदक्षिणा घालण्यास बराच वेळ लागतो. यावेळी हा धूमकेतू पृथ्वीपासून सुमारे 26 दशलक्ष मैल दूर गेला. शास्त्रज्ञांच्या मते, हिरव्या धूमकेतूला सूर्याभोवती त्याची कक्षा पूर्ण करण्यासाठी हजारो वर्षे लागतात. याआधी हा धूमकेतू 50 हजार वर्षाआधी दिसला होता. यानंतर हा धूमकेतू कधी दिसेल हे सांगता येत नाही.

  • IIA ने टिपले दृष्य

भारतीय खगोल भौतिकशास्त्र संस्थाने लडाखमधील (Ladakh) हानले येथे हा हिरवा धूमकेतू पृथ्वीजवळून प्रवास करत असतानाचे सुंदर फोटो टिपले आहेत. IIA बेंगळुरू येथील खगोलशास्त्रज्ञांनी हिरवा धूमकेतू पाहिला. यासाठी शास्त्रज्ञांनी हिमालयन मून टेलिस्कोपचा वापर केला. शास्त्रज्ञांनी सांगितले की, हा हिरवा धूमकेतू त्याच्या ग्रहांसह सूर्याभोवती फिरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT