Ukraine President Volodymyr Zelenskyy News, Russia Ukraine war News Updates Dainik Gomantak
ग्लोबल

शरणागतीस युक्रेन सरकारचा नकार

रशियाकडून विविध शहरांमध्ये तोफगोळ्यांचा मारा सुरूच

Snehal Deshmukh

लव्हिव: वेढा घातलेल्या मारीउपोलमध्ये शस्त्रे खाली ठेवा आणि पांढरे निशाण फडकावून शरणागती पत्करा, असा रशियाने दिलेला इशारा युक्रेन सरकारने साफ धुडकावून लावला आहे. शरणागतीबाबत कोणतीही चर्चा होणार नाही, असे युक्रेनने स्पष्ट केले आहे. रशियानेही किव्ह आणि खारकिव्ह या शहरांसह युक्रेनच्या सर्व भागांमध्ये हवाई हल्ले सुरुच ठेवले आहेत.

मारिउपोलला रशियाने गेल्या तीन आठवड्यांपासून वेढा घातला आहे. तरीही हे शहर अद्याप रशियाच्या ताब्यात आले नाही. रशियाने काल रात्री या शहरातील नागरिकांना शहर सोडून जाण्यासाठी दोन ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच, युक्रेनी सैन्यानेही शरणागती पत्करण्याचे आवाहन केले होते. मात्र, युक्रेनने त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. (Russia Ukraine war News Updates)

रशियाचे हल्ले सुरूच

मारीउपोलमध्ये रशियाने काल (ता. 20) एका शाळेवर बाँबफेक केली होती. यावेळी शाळेत चारशे नागरिक आश्रयाला होते. शाळेची इमारत पडल्यानंतर ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकून पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. युक्रेनने जीवित हानीबाबत अधिकृत माहिती दिली नाही.

रशियन लोकांचेही पलायन

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याला रशियातूनही विरोध होत असून अनेकांनी सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले आहे. आंदोलकांना विविध गुन्ह्यांखाली अटक होत असल्याने अनेकजण रशियातून बाहेर पळून जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Flight Cancelled: हिंडन ते गोवा विमानसेवा रद्द; ऐनवेळी प्रवाशांचे नियोजन बिघडले, एअर इंडिया एक्सप्रेसवर संताप

Calangute Drowning: मित्र नको म्हणाले तरी समुद्रात गेला, मोठी लाट आली आणि घात झाला; मणिपूरचा युवक कळंगुट किनाऱ्यावर बुडाला

Konkan Railway: गोव्यात रेल्वेतून आलेल्या 1104 परप्रांतीयांची तपासणी! कोकण रेल्वे पोलिसांची सुरक्षा मोहिम

Goa Assembly Live: आलेमाव यांनी वनहक्क दाव्यांचा मुद्दा उपस्थित केला

Old Goa construction: जुने गोवेतला ‘तो’ बंगला पाडा! विरोधक आक्रमक; सभापतींसमोर घेतली धाव, कामकाज स्‍थगित

SCROLL FOR NEXT