Gotabaya Rajapakse Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka: गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेला परतणार? जुलैमध्ये गेले होते पळून

Sri Lanka: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पुढील आठवड्यात कोलंबोला परत येऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

Gotabaya Rajapakse: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पुढील आठवड्यात कोलंबोला परत येऊ शकतात. देशातील प्रचंड आर्थिक आणि राजकीय संकटानंतर त्यांच्याविरुद्ध झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर त्यांना जुलैमध्ये देश सोडावा लागला होता.

दरम्यान, राजपक्षे यांचे निकटवर्तीय श्रीलंकेचे माजी राजदूत उदयंगा वीरतुंगा यांचा हवाला देत डेली मिररने हे वृत्त दिले आहे. राजपक्षे 24 ऑगस्ट रोजी मायदेशी परत येऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत. श्रीलंका (Sri Lanka) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यावरुन देशभरात लोक निदर्शने करत आहेत. याच कारणामुळे राजपक्षे यांना परदेशात पळून जावे लागले. राजपक्षे यांनी गेल्या महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या जागी रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांना देशाचे नवे राष्ट्रपती बनवण्यात आले.

वीरतुंगा म्हणाले- राजपक्षे हे हुशार नेते नाहीत, ते हुशार अधिकारी आहेत

वीरतुंगा यांना या वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. यातच आता प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'राजपक्षे हे हुशार नेते नसून हुशार अधिकारी आहेत.' वीरतुंगा यांच्यावर 2006 मध्ये श्रीलंकेने युक्रेनकडून मिग-27 लढाऊ विमानांच्या खरेदीत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. राजपक्षे श्रीलंकेचे संरक्षण सचिव असतानाची ही घटना आहे.

वीरतुंगा पुढे असेही म्हणाले की, 'जनतेला पुन्हा मूर्ख बनवता येणार नाही. महिंदा राजपक्षे यांच्यात जे गुण आहेत, ते त्यांच्याकडे नाहीत. म्हणून त्यांनी सर्वकाही चुकीचे केले.' गोटाबाया राजपक्षे हे गेल्या आठवड्यात सिंगापूरहून (Singapore) थायलंडला गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंका सरकारच्या विनंतीवरुन त्यांना थायलंडमध्ये (Thailand) प्रवेश देण्यात आला होता. एक महिना ते सिंगापूरमध्ये राहिले. दुसरीकडे, श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींनी देशात आश्रय मागितल्याचा दावा थायलंडने नाकारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT